ओन्ली कमल; महायुतीतही भाजपालाच पसंती!!
आजपासून मुलाखतींचा धडाका,मविआच्या बुडत्या जहाजात नको रे बाबा, इच्छुक नाकारणार उमेदवारी
(विजयकुमार पिसे)
महापालिका निवडणुका जाहीर होताच सोलापूरसह राज्यभरातून ओन्ली कमलची डिमांड वाढली असून, आज मंगळवारपासून सर्व 844 इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींचा तीन दिवसांमध्ये फडशा पडेल. दरम्यान बुडत्या जहाजात नको रे बाबा म्हणत "मविआ"तील इच्छुक नेतेमंडळींनी लढण्यापूर्वीच आपली शस्त्रे टाकून दिली आहेत. महायुतीमध्येही भाजपालाच पसंती असून युती करू, प्रसंगी कमळ चिन्हावरच लढू अशी मानसिकता तयार झाली आहे.
सोमवारी राज्यातील सर्व 29 महापालकांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले. पण मविआ गाफील राहिली. त्यामुळे निवडणुकीची घोषणा होताच इच्छुकांमध्ये चलबिचल सुरू झाली. लढलो तरी पडायचे कशासाठी, ही मानसिकता आहे. त्यामुळे इच्छुकांनी *ओन्ली कमलशी संपर्काच्या प्रयत्नात होते. महायुतीमध्ये शिंदे सेना,अजीतदादांना भाजपा सोबत घेणार असली तरी इच्छुक उमेदवारांची पसंती "ओन्ली कमल" आहे. युतीमध्ये लढलो तरी कमळ चिन्हावरच लढू, कारण मतदारांचा *ओन्ली कमलवर विश्वास आहे. तिथेच आपले भवितव्य आहे. भाजपा सांभाळून घेईल, आणि समजून पण घेईल. हा कल अनेकांनी बोलून दाखवला.
मविआची स्थिती यापेक्षा दयनीय झाली असून संपूर्ण आघाडी मिळून 102 ठिकाणी उमेदवार मिळतील की नाही, लढतील की नाही, हे आज तरी अनिश्चित आहे. या दरम्यान जिथे बर्यापैकी ताकद आहे, तिथे मविआचे उमेदवार लढण्यासाठी स्वत:च प्रभाग/जागा निश्चित केल्या आहेत.
*गाजावाजा न करता भाजपाच्या मुलाखती
येत्या तीन दिवसात भाजपाच्या मुलाखतींचा धडाका संपणार असून एका दिवसात 10 प्रभागांच्या मुलाखती होतील. मंगळवारी 16 रोजी स.9 ते दु.2 प्रभाग1 ते 5 आणि दु.3 ते सायं 7 प्रभाग 6 तेे 10. बुधवारी 17 रोजी सकाळच्या सत्रात प्र.11 ते 15 आणि दुपारी. प्र.16 ते20 आणि गुरुवारी 18 डिसेंबरला सकाळी प्र.21 ते 23 आणि दुपारी प्र.24 ते 26, असे वेळापत्रक कार्यालयमंत्री श्रीहरी म्याकल यांनी जाहीर केले. कोणताही गाजावाजा(बॅन्डबाजा) न करता एकेकट्या उमेदवाराने स्वत: मुलाखतीस उपस्थित राहावयाचे आहे. मुलाखतींमधून *पार्टी विथ डिफरन्सचा संदेश देखील जाणार आहे.
What's Your Reaction?