रवी बॉस अडकले कडोम्पात; घाऊक गेटकेनमुळे महायुतीत कोेेंडी
रवी बॉस अडकले कडोम्पात; घाऊक गेटकेनमुळे महायुतीत कोेेंडी
(विजयकुमार पिसे)
नरेंद्र...देवेंद्र...रवींद्र पर्वमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात सहा महिन्यापूर्वी दबंग चर्चा होती. पण रवी बॉस 'कडोम्पा'त अडकल्यामुळे आता एकाकी पडले असावेत. त्यांनी नको तिथे घाऊक गेटकेन केले. त्यामुळे महायुतीत रवीबॉस म्हणजे मीठाचा खडा अशी भावना निर्माण झाली आहे. काही महापालिका क्षेत्रात भाजपाला युतीशिवाय आता पर्याय राहिला नाही. अन्यथा मोटाभाई खेळ बिघडवू शकतात.
पहिले प्रक़रण रवी बॉसनी पालघरमध्ये मॉब लिचिंगमधील आरोपी चौधरी यांस भाजपात घेतले. नंतर याची बोंबाबोंब होताच 24 तासात चौधरी यांना भाजपातून गेटआऊट करावे लागले आहे. याशिवाय त्यांच्या कडोम्पा क्षेत्रातही त्यांनी लक्ष घालून, अनेक जहाल शिवसैनिकांच्या हातात कमळ दिले. तिथेही नंतर रवीबॉसना माघार घ्यावी लागली. कोकणात घाऊक गेटकेनमुळे महायुतीच्या काही घटक पक्षांनी एकनाथ शिंदेंच्या माध्यमातून थेट दिल्लीश्वरांकडे साकडे घातले. मोटाभाईंनी दिल्लीत डोळे वटारताच कडोप्मा शिवाय अन्य महापालिकामधील घाऊक गेटकेन रोखले गेले.
दोन आठवड्यापूर्वी एकनाथ शिंदेंनी दिल्लीत मोटाभाईंची भेट घेतली. तेव्हा रवी बॉसचे मोटाभाईंनी कान पिरगाळले. त्यामुळे भाजपात घाऊक गेटकेनला ब्रेक लागला. सार्या घडामोडी अलीकडच्या काळातील आहेत. रवींद्र चव्हाण यांनी प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतली. मागील अध्यक्ष/पूर्वसूरींनी जी चौकट आखून दिली होती, ती चौकट मोडीत निघाली. तेव्हा मात्र रवी बॉसना पुन्हा दिल्ली पाचारण केले. तिथे मोटाभार्ईनी चांगलाच दम भरला. त्यामुळे पक्षात घाऊक गेटकेनचे प्रकार बंद झाले आहेत. जिथे पक्ष पोहोचू शकत नाही. वा सक्षम उमेदवार बाहेरून आणावयाचा असतो, तेव्हा त्याचे गेटकेन करावे, यापूर्वी निवडणुकांच्या पृष्ठभूमीवर आवश्यक तिथेच पक्षप्रवेश घडवून आणले. त्यामुळे गतवेळी महापालिकेवर भाजपा भगवा फडकू शकला. ही कोंडी फुटली तरच रवी बॉस खर्या अर्थाने भाजपाला आत्मनिर्भर अध्यक्ष लाभले असे म्हणता येईल. कडोम्पा: कल्याण डोंबिवली महापालिका हे रवींद्र चव्हाण यांचे होमपीच आहे. घरच्या मैदानावर अधिक धावा काढण्यासाठी शिंदे सेनेच्या विकेट्स घेण्याचा प्रयत्न होता. शिवाय अध्यक्ष म्हणून राज्यात आपला दबदबा वाढवण्याचा हेतू होता. पण अमित शाह यांनी डोळे वटारल्यानंतर रवी बॉस एकाकी पडले.
What's Your Reaction?