सहकारात स्वाहाकार, भाजपा नेत्याच्या बँकेवर इडी, एकास अटक

अमित शाहांकडे तक्रार, नेता पक्षाचा असला तरी कारवाई, सुपर वॉशिंग मशिन ही टीका अनाठायी,पार्टी विथ डिफरन्स ते हेच,निवडणूक़ काळात कारवाईने खळबळ

Dec 26, 2025 - 00:08
 0  389
सहकारात स्वाहाकार, भाजपा नेत्याच्या बँकेवर इडी, एकास अटक

(विजयकुमार पिसे) 

  भाजपा सुपर वॉशिंग मशीन नाही, पार्टी विथ डिफरन्स. घोटाळा कुणीही केला तरी सुटका नाही. केंद्रीय गृहमंत्री तथा सहकारमंत्री अमित शाहांकडे एका तक्रारीनंतर झालेली ही कारवाई. पश्‍चिम महाराष्ट्रातील भाजपा नेत्याने सहकाराचा स्वा:हाकार केला. त्यामुळे इडीने हिसका दाखवला असून एकास अटकही केली आहे. एका खासदाराच्या तक्रारीमुळे पक्षाने गंभीरपणे दखल घेतली आहे. राज्यात निवडणुकांचे वातावरण तापल्यानंतरही पक्षाने धाडस दाखवले असून योग्य तो नॅरेटिव्ह गेला आहे.

   फलटण येथील यशवंत को-ऑपरेटिव्ह बँकेतील 112 कोटींचा गैरव्यवहार झाला असून गेले अनेक महिने याची जाहीर चर्चा आहे. पण कारवाई झालीच नाही. तेव्हा केंद्रीय सहकारमंत्र्यांचे "लक्ष्यवेधा"वे लागले. अखेर ईडीने सातारा, फलटण आणि कराड येथील शाखांवर मंगळवारी छापे टाकले.

    2014 मध्ये फडणवीस सीएम असताना सहकार परिषदेचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) म्हणून शेखर चरेगावकर यांची नियुक्ती झाली होती. इडीच्या कारवाईने आता त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. तसेच त्यांचा धाकटा भाऊ मुकुंद चरेगावकर यास ताब्यातही घेतले आहे. फलटणचे माजी आमदार स्व.कृष्णचंद्र भोईटे यांनी स्थापन केलेल्या यशवंत बँकेत 112 कोटींचा गैरव्यवहार झाल्याची बाब लेखापरीक्षणात समोर आली. या संदर्भात सनदी लेखापालांच्या फिर्यादीवरून कराड पोलीस ठाण्यात शेखर चरेगावकर यांच्यासह 50 जणांवर गुन्हा दाखल होता. मात्र पोलिसांनी कोणावरही कारवाई केली नाही. दरम्यान या संशयितांनी अटकपूर्व जामीनसाठी केलेला प्रयत्नही असफल ठरला. ईडी पथकाने मुकुंद चरेगावकरच्या निवासस्थानी पहाटेच कारवाई केली,याची बँकेतील अधिकारी, कर्मचार्‍यांना कसलीच कल्पना नव्हती. हे पथक सकाळी बँकेत दाखल झाल्यानंतर सगळ्यांचेच धाबे दणाणले.

   भाजपाच्या राज्यसभा खासदार मेधाताई कुलकर्णी यांनी बँकेतील गैरव्यवहाराबद्दल आरबीआयकडे तक्रार केली होती. तसेच अमित शाहांची भेट घेतली. यानंतर कारवाईची पावले उचलली गेली असे दिसते. यासंदर्भात खा. मेधाताई कुलकर्णी म्हणाल्या की, यशवंत बँकेतील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सर्व संशयितांना 'एमपीआयडी' लागू झाला पाहिजे. सर्व संशयितांच्या मालमत्ता जप्त करून ठेवीदारांची मिळावी. बचत गटातील महिलांपासून ते सर्वसामान्य नागरिक यांच्या नावावर कर्जे काढली आहेत. त्याचीही सखोल चौकशी करा. ईडीची कारवाई ही चांगली सुरुवात आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow