काँग्रेसमुक्त भाजपाची मजबुरी!
भाजपा चाणक्यांनी गृहित धरले, म्हणून लोकसभेला आपटी;आता पुन्हा ये रे माझ्या मागल्या! अनगरकर,माने, निमगावकर आणखी बरेच घाउक गेटकेनसाठी रेड कार्पेट
(विजयकुमार पिसे)
लोकसभा निवडणुकीत माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघ हातचा गमावला. भाजपा चाणक्यांनी अनगरकर, निमगावकर,माने अशा अनेक काँग्रेसींवर विश्वास ठेवला. त्यांना लक्ष्मीदर्शनही घडविले. आम्ही जिंकरणारच, हा अतिआत्मविश्वास, लोकमानस गृहित धरले. आणि अपेक्षित असाच कौल दिला. दोन लोकसभा मतदारसंघ विरोधकांना गिफ्ट म्हणूनच दिले. आता पुन्हा ये रे माझ्या मागल्या. घाऊक गेटकेनसाठी रेडकार्पेट. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुतीचे शिंदे,अजितदादा आणि मविआचे समूळ उच्चाटन ही भाजपाची मजबुरी..
बुधवारी प्रदेश कार्यालयात देवाभाउंच्या अनुपस्थितीत राजन पाटील परिवार, इंदापूरकर यशवंत माने, निमगावकर शिंदे परिवार यांचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी स्वागत केले. तसेच मोहोळच्या क्षीरसागर परिवाराची घरवापसीही झाली. मूळचे काँग्रेसी पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भाजपा संघटनेत नवीन गटाची भरती आ.सचिन कल्याणशेट्टी यांच्या साक्षीने झाली. पक्ष प्रवेशाचा हा पहिला अंक. पुढच्या अंकात माजी आ. दिलीप माने, दीपक आबा साळुंके, संजयमामा शिंदे, सुरेश हसापुरे. कल्याणशेट्टी आणि म्हेत्रे यांच्यात दिलजमाई झाली तर म्हेत्रे शिंदे सेना सोडून भाजपात येतील. भविष्यात खा.धैर्यशील मोहिते पाटील आ.उत्तम जानकर देखील भाजपात आले तर आश्चर्य वाटू नये. कारण आ.रणजीतसिंह मोहिेते पाटील यांच्यावर शिस्तपालन समितीची कारवाई होणार नाही, हे जवळपास नक्की. त्यामुळे पार नातेपुते पासून दुधनीपर्यंत सर्वत्र काँग्रेसयुक्त कमळ फुलणार हे अटळ.
राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे राजन पाटील, माजी आ. यशवंत माने, विक्रांत ऊर्फ बाळराजे पाटील, अजिंक्यराणा पाटील, प्रकाश चवरे, दीपक माळी, अस्लम चौधरी, भारत सुतकर, धनाजी गावडे, प्रशांत बचुटे, माजी सभापती जालिंदर लांडे, सज्जन पाटील, प्रमोद डोके, अॅड.राजाभाऊ गुंड पाटील, कुंदन धोत्रे, रत्नमाला पोतदार, जोत्स्ना पाटील, सिंधुताई वाघमारे, यशोदा कांबळे, राहुल मोरे, बाळासाहेब भोसले, विश्वजीत पाटील आदी 50 पदाधिकारी यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला, अशी माहिती प्रदेश भाजपा कार्यालकडून प्राप्त झाली.
*प्रदेशाध्यक्षांची मजबुरी...*
या पक्षप्रवेश सोहळ्यापूर्वी एक दिवस आधी दक्षिण सोलापूरच्या कार्यकर्त्यांचे एका शिष्टमंडळाने मुंबई प्रदेश कार्यालयात अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली. पक्षात इनकमिंग अटळ आहे, मी काही करू शकत नाही. माझ्या हातात काही नाही. असे सांगताना त्यांनी मोहोळ यांचे उदाहरण दिले. पुण्यात मोहोळक़रांनी धंगेकरांना समजून घेतलेे असते तर, पक्षाची नाचक्की टळली असती. आज पुण्यात, उद्या फलटण, आणि नागपुरात बच्चूभाऊनी भाजपला कडू गोळी दिली आहे. जहाजात क्षमतेपेक्षा अधिक भरले गेले तर अशा कैक कडू गोळ्या मिळत राहतील.
काँग्रेसमुक्त भारत जनतेने मनापासून केले पाहिजे. काँग्रेसयुक्त भाजप हे लोकजनमानस स्वीकारेल?
What's Your Reaction?