वारकरी संप्रदायाची भगवी पताका डौलाने फडकवूया
महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. वारकरी संप्रदायाला आणि वारीला शेकडो वर्षांची परंपरा लाभलेली आहे. वारीमुळे पंढरपूरच्या विठ्ठलाशी एकरुप झालेला हा वारकरी संप्रदाय ही ओळख कायम झाली आहे. आज आषाढी एकादशी, या शुभदिनी सर्वव्यापी, सर्वस्पर्शी राष्ट्रीय आणि वैचारिक विमर्श प्रस्थापित करण्याच्या भूमिकेतून लक्ष्यवेध न्यूजची मुहूर्तमेढ रोवली. वर्षपूर्तीच्या वाटचालीत सदैव साथ होती, ती पुढे अशीच अखंड राहावी, ही मनोकामना। तसेच आषाढी एकादशीनिमित्त लक्ष्यवेध परिवाराच्यावतीने सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा.

पंढरीचा विठुराया आणि वारकरी यांचं नातं घट्ट आहे.वारकर्यानी किमान एक तरी वारी करावी असे म्हटले जाते. वारीची आणि संप्रदायाची परंपरा ही ज्ञानेश्वरांच्या आधीपासून चालू असल्याचे अनेक दाखले आहेत. ज्ञानोबारायांचे वडील देखील नियमित वारी करीत होते. त्यामुळे वारीला आठशे वर्षांपेक्षा जास्त काळाची परंपरा असल्याच लक्षात येते.
संत बहिणाबाई आपल्या एका अभंगात म्हणतात की,संतकृपा जाली ।
इमारत फळा आली ॥
ज्ञानदेवें रचिला पाया ।
उभारिले देवालया ॥
नामा तयाचा किंकर ।
तेणे रचिले तें आवार ॥
जनार्दन एकनाथ।
खांब दिधला भागवत ॥
तुका झालासे कळस । भजन करा सावकाश ॥
या अभंगातून एकाअर्थाने वारकरी संप्रदायाच्या प्रचार प्रसाराची माहिती मिळते. यामुळे वारकरी संप्रदाय जातीपाती प्रांत याच्या पलीकडे जाऊन आपल्या संप्रदायाची भगवी पताका डौलाने फडकवतोय, ती अशीच अखंड फडकत राहो.
आषाढी आणि कार्तिकी या दोन मुख्य वार्या. आजच्या एकादशीला आषाढी किंवा देवषयनी एकादशी म्हणतात. एकादशीला वैष्णवांचा मेळा पंढरपुरात भरलेला असतो. वारीचा नयनरम्य सोहळा डोळ्यात साठवून ठेवावा असाच असतो. म्हणून जीवनात प्रत्येकाने एकदा तरी वारी अनुभवावी असे सांगितले जाते. म्हणूनच महाराष्ट्रातील पंढरपूरची वारी आता अभिमानाची, सानंद जीवनाची लक्ष्यपूर्ती होय. महाराष्ट्राची ही गौरवशाली परंपरा अबाधित ठेवण्याचे अखंड कार्य संतसमागमे वारकरी संप्रदायाचे मोठे योगदान आहे. ङ्गपुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय.
सर्वव्यापी, सर्वस्पर्शी कार्यरत लक्ष्यवेध न्यूज पोर्टलची आज वर्षपूर्ती. लक्ष्यवेध न्यूजचे असंख्य वाचक, जाहिरातदार, हितचिंतक, स्नेही यांचे आशीर्वाद हेच आमचे पाठबळ. राष्ट्रीय आणि वैचारिक विमर्श प्रस्थापित करण्याच्या लक्ष्यवेधच्या वाटचालीत सदैव साथ हवी, ही नम्र प्रार्थना. वर्षपूर्तीनिमित्त लक्ष्यवेध परिवाराच्यावतीने मन:पूर्वक शुभेच्छा।
विजयकुमार पिसे, संपादक
What's Your Reaction?






