म्हेत्रेंचे नवे हिंदुत्व आणि अक्कलकोटचे गो राजकारण
24 तासात आ.सचिन कल्याणशेट्टी आणि सिध्दाराम म्हेत्रे यांच्यात स्वागत आणि आव्हान प्रतिआव्हान, महायुतीत नवा भिडू आल्यानंतर राजकीय पटलावर आणखी काही घडणार की घडत राहणार, सोलापूर बाजार समिती निवडणुकीचा हा तिसरा अंक! म्हेत्रे काँग्रेसमधून "गो" आणि शिवसेनेत "कम" झाले तर आता पुढे काय?

(विजयकुमार पिसे)
24 तासात आ.सचिन कल्याणशेट्टी आणि सिध्दाराम म्हेत्रे यांच्यात स्वागत आणि आव्हान प्रतिआव्हान, महायुतीत नवा भिडू आल्यानंतर राजकीय पटलावर आणखी काही घडणार की घडत राहणार, सोलापूर बाजार समिती निवडणुकीचा हा तिसरा अंक! म्हेत्रे काँग्रेसमधून "गो" आणि शिवसेनेत "कम" झाले तर आता पुढे काय?
सत्ताधारी महायुती महाविकास आघाडीत बिघाडी करून त्यांचा लक्ष्यवेध घेणार ही राजकीय अपरिहार्यता. पण महायुतीतच नवा भिडू आल्यानंतर पुढे काय काय होणार याची उत्सुकता वाढली असून अक्कलकोटचे माजी आ.सिध्दाराम म्हेत्रे यांच्या शिंदे सेना प्रवेशाचे आ. कल्याणशेट्टी यांनी प्रारंभी केलेले स्वागत आणि नंतर आव्हान प्रतिआव्हानाच्या "विडिओ"मुळे पुढे काय? सोलापूर बाजार समितीची झालेली निवडणूक त्याची ही सुरवात होती, आता तिसरा अंक सुरू झाला आहे. "गो" आणि "कम" राजकीय वातावरण गढूळ होते की काय?
राज्याचे माजी गृहमंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांच्या घरात तीन पिढ्या काँग्रेस. पण राजकीय अपरिहार्यतेमुळे म्हेत्रे यांना नाईलाजाने नवे हिंदुत्व स्वीकारावे लागले. हे हिंदुत्व म्हणजे "आरे" ला "कारे" असेच राहणार आहे. त्यामुळे कोण कोणाच्या तालमीतले आहेत, जनता त्यांना चांगली ओळखून आहे. गेल्या 24 तासात अनेक घडामोडी घडत आहेत, समोर व्हिडिओज येत आहेत, खुलासे होत आहेत. आव्हान प्रतिआव्हानाची भाषा आणि त्याचबरोबर अक्कलकोट, सोलापूर ते दिल्ली, मुंबई भेटींचा सिलसिलाही सुरू झाला ही समोर आलेली नवी चर्चा. आता प्रश्न पडेल हे का? अक्कलकोट तालुक्यातील जनतेला कदाचित माहीत असेल. म्हेत्रेंच्या प्रवेश घोषणेवर अशा घडामोडींनी घेतलेला वेग पाहता बाजार समितीची निवडणूक सोलापुरात (दक्षिण आणि उत्तर सोलापूर तालुक्यात) पण त्याची धग अक्कलकोट तालुक्यात पोहोचली का? अशी नवी चर्चा रंगू लागली आहे.
काल म्हेत्रे म्हणाले होते, अक्कलकोट तालुक्यात अडलेली विकास कामे मार्गी लावण्यासाठी आणि आमच्या कार्यकर्त्यांची होणारी कुचंबणा/अडवणूक दूर करण्यासाठी सत्तेबरोबर जाणे नाईलाज आहे. पुढे हे देखील म्हणाले की, माझ्या तालमीतच सगळे घडले आहेत. आणि आम्ही सारे एकच आहोत. कोण कुणाचा शत्रू नसतो. महायुतीत आल्यानंतर एकत्रच काम करणार आहोत. म्हेत्रे 16 वर्षे आमदार होते, ती त्यांची एकट्याची ताकद नव्हती. भाजपातीलच काही असंतुष्ट मंडळी प्रत्येक निवडणुकीत त्यांना मदत करत होती. (म्हेत्रे म्हणतात ती तालीम ही). ते कोण होते, हे काही झाकून राहिलेले नाही. किंवा कुणी धुतल्या तांदळाचे नाहीत. पण तालीम वरून आव्हानाची सुरू झालेली भाषा, तालुक्यातील अवैध धंदे यावरून राजकारण पेटले आहे. त्यात नाहक मुख्यमंत्र्यांनाही ओढले गेले. त्यामुळे महायुतीत बेरजेच्या भाषेऐवजी गुणाकार आणि भागाकार सुरू झाला. दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना गुरुवारी ठणकावले. महायुतीत वातावरण बिघडेल असे भाष्य कुणी करू नये.पण अक्कलकोट तालुक्यात नवं घडतंय की बिघडतंय?
"सोलापूर बाजार समिती निवडणुकीत भाजपाला फक्त दक्षिणा असा विमर्श प्रक़ट करणारे वृत्त लक्ष्यवेधने दिले होते." चार आमदार आणि मोठा भाऊ असूनही भाजपा उपेक्षित राहणार. आणि झालेही तसेच. मृतप्राय झालेल्या काँग्रेसी नेत्यांना या निवडणुकीत संजीवनी मिळाली. विरोधात बसण्याऐवजी ते सत्ताधारी झाले. भाजपाच्या ( फडणवीस) आशीर्वादात अशी ताकद असेल आणि सत्तेचे वरदान मिळत असेल तर म्हेत्रे मागे का राहतील. त्यांनीही महायुतीची वाट धरली. हातात शिंदे सेनेचे धनुष्यबाण म्हणजे शत्रूचा लक्ष्यवेध.
काँग्रेसचे जुने नेते देवकते, शिवदारे गट बाजार समिती निवडणुकीतील सार्या घडामोडींमुळे हतबल आणि हताश झाले होते. आहेत. भाजपाच्या चिरंजीवी आशीवार्दाला त्यांचाही आक्षेप आहे. त्यामुळे देवकते गट, काका साठे एका बाजूला गेला तर राजशेखर शिवदारे संचालक म्हणून निवडून आल्यानंतरही सत्ताधारी (भाजपा/काँग्रेस) गटात राहिले नाहीत. का? दरम्यान मंगळवारी 20 मे रोजी मार्केट कमिटीत नूतन सभापती, उपसभापती व संचालक यांच्या सत्कार सोहळ्याला एक आमदार दिसले नाहीत. त्यामुळे "गोमय" राजकारण म्हेत्रेंच्या "इनकमिंग" नंतर कोणत्या वळणावर जाईल, हे 31 मे नंतर कळून चुकेल.
What's Your Reaction?






