भाजपाचा सुंठीवाचून खोकला गेला, दादा-भाईंची फिफ्टी-फिफ्टी, ही खरीगेम..
भाजपाचा सुंठीवाचून खोकला गेला, दादा-भाईंची फिफ्टी-फिफ्टी, ही खरीगेम..
(विजयकुमार पिसे)
युती धर्म पाळला नाही, हे बोल आता भाजपाला लागणार नाही. आकडा मोठ्ठा सांगायचा आणि स्वत:च आकसायचे. इथेच शिंदेसेनेची ताकद कळाली. दादा गट किती हे देखील ठाऊक. त्यामुळे दादा-भाईंनी सोलापुरात फिफ्टी फिफ्टी करून भाजपाशी कट्टी केली. हे मोठ्ठे आव्हान उभेे केले. पण भाजपाचा सुंठीवाचून खोकला गेला. तिकीट नाकारलेले भाजपातील अनेक इच्छुक धनुष्यबाण घेणार होते,त्यांचा रस्ता बंद झाला. ही खरी गेम कुणाच्या लक्षात कशी आली नाही.
भाजपाने 852 जणांच्या मुलाखती घेतल्या. 102 तिकीटं कशी वाटायची, हे भाजपा समोरचे आव्हान. दादा-भाईंनी इतकी घाई केली की तिथेही भाईंचा दादांनी गेम केला. कारण चर्चेत दादामंडळी भलतेच हुश्यार. भाईं गटाचे कच्चे दुवे त्यांनी हेरले. 51/51 आकडे नक्की झाले. पण प्रभाग कोणते? तिथे खरी कसोटी. ठराविक प्रभागांमध्ये दादा-भाई तगडे. इतरत्र टांगा पलटी हे त्यांनाही माहिती. दोघांच्या भांडणात तिसरा...!
2017 च्या निवडणुकीत भाजपासमोर एकत्रित शिवसेना आणि राष्ट्रवादी होती. जिंकले अनुक्रमे 21 आणि 4 जागा. आता त्यांचे दोन पक्ष झालेत. मशाल आणि तुतारीची काँग्रेसच्या हाताला साथ, सोबतीला दादा-भाई. त्यामुळे मविआ आणि युतीचे भाजपाला तगडे आव्हान. जागा वाटप, उमेदवारी आणि प्रचार यंत्रणा इथेच खरा खेळ सुरू होतो. त्यामुळे भाजपा धूर्त खेळी करून खिंडीत गाठण्याचा प्रयत्न करेल. दादा-भाईंचे खरे *लक्ष्य मुंबईपुणेपिंपरीत. सोलापुरात कशाला वेळ खर्ची घाला. हा सारा मामला. म्हणून भाजपाचा सुंठीवाचून खोकला गेला.
What's Your Reaction?