म्हणजे, फडणवीस असे म्हणालेच नव्हते!
बाजार समिती निवडणुकीबाबत बावनकुळेंचा खुलासा हाच पुरावा. म्हणजे हा सूर्य हा जयद्रथ! सहकार क्षेत्रात निवडणुकीसाठी सर्व आमदारांना परवानगी होती. याचा अर्थ काँग्रेसने भाजपाच्या सत्तेचा वापर करून घेतला आणि तेच सत्ताधारी झाले.
(विजयकुमार पिसे)
सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समिती निवडणूक भाजपाच्या नेतृत्वाखाली लढवावी, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेत. हे साफ खोटे ठरले असेच म्हणावे लागेल. कारण प्रदेश भाजपा अध्यक्ष बावनकुळे यांनीच काल सोलापूर दौर्यात खुलासा केल्यामुळे सत्य समोर आले आहे. फडवीस त्यांच्या सूचनेनुसारच काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत घेउन सत्ताधारी गटाचे पॅनल केले आहे. अशा प्रकारची माहिती आ.सचिन कल्याणशेट्टी यांनी दिली. त्यास दुजोरा देत कल्याणशेट्टींना सोलापूऱ शहरातून ताकद दिली गेली. परंतु तसे काही नव्हते. हा सूर्य हा जयद्रथ हे बावनकुळे यांच्या खुलाशामुळे स्पष्ट झाले आहे. *महसूलमंत्री बावनकुळे काय म्हणाले ते पहा... सहकार क्षेत्रात राजकारण नसते. त्यामुळे सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीत आमच्या आमदारांना जसा हवा तसा निर्णय घेण्याची मुभा दिली होती. आमच्यासाठी संघटना महत्वाची आहे.
आ.सुभाष देशमुख यांनी कार्यकर्त्यांसाठी पॅनल केले होते. त्यांना संधी मिळावी, असा त्यांचा दावा होता. त्यामुळे सर्व आमदार विजयकुमार देशमुख, सचिन कल्याणशेट्टी आणि देवेंद्र कोठे यांच्यासह सुभाष देशमुख यांनी पॅनल केले असते तर? भाजपाची एकजूट आणि ताकदही दिसली असती. आणि काँग्रेस व राष्ट्रवादी यांना हवे तर ते या पॅनलमध्ये आले असते. कदाचित निवडणूक बिनविरोधही झाली असती. परंतु पॅनल काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आणि ताकद सत्ताधारी भाजपाची. अर्थात विरोधकांनी भाजपाच्या सत्तेचा वापर करून घेतला आणि भाजपा विरोधक आता मार्केट कमिटीत (काँग्रेस) सत्ताधारी झालेत. हा घडलेला इतिहास. या निवडणुकीबाबत दोन्ही देशमुख सातत्याने म्हणत होते. आम्हाला फडणवीस साहेबांचा निरोप नाही. तसेच प्रदेश भाजपाकडूनही (बावनकुळेंसह) तसे काही सांगितले गेले नाही. याचा अर्थ असा आहे की, फडणवीस साहेबांचा विश्वास सार्थ केला म्हणजे त्यांचा पाठिंबा आहे. आणि बहुदा असेच झाले असावे. गुमराह करण्याचा हा प्रयत्न. त्यामुळे आ.सुभाष देशमुख व आ.विजयकुमार देशमुख यांचा एक गट. आणि आ. कल्याणशेट्टी आणि आ.देवेंद्र कोठे यांचा एक गट. म्हणजे भाजपा दोन गटात विभागली गेली. काँग्रेसमध्ये अशीच गटबाजी होती, आहे. म्हणून आज या पक्षाची वाट लागली आहे. आपणही काँग्रेसी मार्गावर जायचे का?
What's Your Reaction?