2021 तेव्हा ठाकरे ब्रॅन्डचा भूकंप घडवला... 2029 मध्ये कोणता भूकंप घडवणार?
हिंदीवरून गेले दोन दिवस राज्यात ब्रँडची जोरात चर्चा सुरू आहे. आणखी काही दिवस, नव्हे. महिने ब्रँडची चर्चा राहील. 2019 मध्ये अनपेक्षित सत्ताधीश...सामान्य शिवसैनिक नव्हे तर नेताच सीएम झाल्याचे कोटी कोटी मराठी माणसांनी पाहिले. पण 2021 मध्ये राजकीय भूकंप ़घडवला. त्या बॅ्रण्डचा भूकंप...तो घडवणारा नेता होता रवींद्र चव्हाण.

विजयकुमार पिसे
भाजपा प्रदेश अध्यक्ष म्हणून 1जुलै रोजी त्यांनी पदभार घेतला. आणि सर्वसामान्य कार्यकत्यार्र्ंची अपेक्षा आहे की, रवींद्र चव्हाण यांनी 2029 मध्येही पुन्हा भूकंप घडवावा. 2029 मध्ये भाजप स्वबळावर सत्तेत असेल, असं अमित शाहांनी जाहीरपणे म्हटलंय. त्यामुळे मिशन शतप्रतिशतची जबाबदारी चव्हाण यांच्याकडे असेल. ठाण्यात एकनाथ शिंदेंच्या वर्चस्वाला शह देण्याची कामगिरी त्यांना पार पाडावी लागेल. असो..
रवींद्र चव्हाण यांचा पहिला भूकंप हा होता, तो घडवण्यात रवींद्र चव्हाण यांचा वाटा मोठा होता. एकनाथ शिंदे ज्या गाडीतून आमदारांना घेऊन गुजरातला गेले होते, त्या गाडीत रवींद्र चव्हाण हे देखील होते. त्यावेळी रवींद्र चव्हाण हे भाजप आणि शिवसेनेमधील महत्त्वाचे दुवा होते. यावरून लक्षात येईल, रिक्षा अॅटो चालक युनियनचा नेता, भाजपाचा सामान्य कार्यकर्ता, कसलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना, रक्ताचं राजकीय वारसा नसताना काय करू शकतो. ते रवींद्र चव्हाण आज दीड कोटी सदस्यसंख्या असलेल्या प्रदेश भाजपाचे अध्यक्ष झाले आहेत.
त्यांची सर्वांना विनंती आहे, कधीच रवीदादा आगे बढो किंवा कधीच रवींद्र चव्हाण आगे बढो असं म्हणायचं नाही, फक्त भाजपा आगे बढो असंच म्हटलं पाहिजे. पदभार घेतल्यानंतर त्यांनी व्यक्त केलेल्या ह्या भावना.
मुख्यमंत्री शिंदे यांच्या मंत्रिमंडळात भाजपाने चव्हाण यांना कॅबिनेट मंत्रिपद देउन ताकद दिली. आणि ठाण्यात शिंदे यांना आव्हान देण्याची कामगिरी चव्हाण पार पाडली. आता प्रदेशाध्यक्ष. येत्या काळात शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात चव्हाण आपला प्रभाव कसा निर्माण करतील, याकडे लक्ष्य राहणार आहे. याचे कारण म्हणजे आजमितीस ठाण्यात भाजपाच 9 आणि शिंदेसेनेचे 6 आमदार आहेत. म्हणजे भाजपा मोठा भाउ आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये त्यांची भूमिका निर्णायक ठरू शकेल.
संघटन कुशलतेचेे पूर्वानुभव म्हणजे मुंबई, ठाण्यासह कोकण पट्ट्यात त्यांची पकड. लोकसभा निवडणुकीत ठाणे, कोकण, पालघर, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, भिवंडी मतदारसंघांची जबाबदारी त्यांच्याकडे होती. भिवंडीवगळता अन्य मतदारसंघात भाजपनं विजय मिळवला. मुंबई, कोकण पट्ट्यात ठाकरे बॅन्डचा प्रभाव आहेच, शिंदेसेनेचेही वर्चस्व आहे. त्याला शह देत सूर्य(रवी)तेज प्रक़ट करून फक्त भाजपा आगे बढो हीच रवींद्र चव्हाण यांची संकल्पसिध्दी. यासाठी त्यांना लक्ष्यवेध न्यूज परिवाराच्या मन:पूर्वक शुभेच्छा
What's Your Reaction?






