अखंड भारत दिन व भारतीय स्वातंत्र दिन निमित्त रक्तदान शिबिर

शिबिरात 88 रक्तदात्यांचे रक्तदान

Aug 16, 2024 - 14:00
 0  8
अखंड भारत दिन व भारतीय स्वातंत्र दिन निमित्त रक्तदान शिबिर
अखंड भारत दिन व भारतीय स्वातंत्र दिन निमित्त रक्तदान शिबिर

 सोलापूर: अखंड भारत आणि 78 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त तसेच पुण्यश्लोक साम्राज्य संघटना वर्धापन दिना निमित्त हत्तुरे वस्ती विमानतळ येथे १५ ऑगस्ट रोजी विहिंप तर्फे भव्य रक्तदान शिबिर पार पडले. यावेळी 88 रक्तदात्यांनी रक्तदान केले.

भारत माता पूजन प्रसंगी  जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंह राजपूत, भाजप शहराध्यक्ष नरेंद्र काळे, परिवहन माजी सभापती जय साळुंखे, विश्व हिंदू परिषद विभाग सहमंत्री विजय कुमार पिसे, विश्व हिंदू परिषद जिल्हा मंत्री संजय कुमार जमादार, विश्व हिंदू परिषद धर्म जागरण व धर्मांतरण जिल्हाप्रमुख जयदेव सुरवसे , उपस्थित होते. रक्तदान शिबिरात ८८ रक्तदात्यानी सहभाग नोंदवला. तसेच या कार्यक्रमास बजरंग दल हनुमान प्रखंड सहमंत्री महेश पाटील श्रीराम नवमी समिती होटगी रोड कार्याध्यक्ष राम मोरे आनंद डांगे, पुण्यश्लोक साम्राज्य अध्यक्ष चंद्रशेखर पाटील, प्रदेशाध्यक्ष निखिल घोडके, बजरंग दलाचे श्रीकांत धुमाळ, बजरंग दल हनुमान प्रखंड संयोजक महेश जगझापे, कार्याध्यक्ष दीपक जळके तसेच अक्षय ब्लड बँक आदिंनी परिश्रम घेतले. या शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे रक्तदात्यांनी विनालाभ स्वयंस्फूर्तीने आपले योगदान दिले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow