भाजपाच्या कुंपणावरचे म्हेत्रेंचा शिंदेसेनेशी घरोबा
संकटसमयी कोण कामास येतो, म्हणून जय महाराष्ट्र; *काँग्रेसच्या शिंदेंची साथ सोडून हातात धनुष्यबाण घेणार; 31 मे रोजी अक्कलकोटी सिध्दाराम म्हेत्रेंचा पक्षप्रवेश*निवडणुकांच्या तोंडावर भरती अभियान

(विजयकुमार पिसे)
भाजपाच्या कुंपणावरील काँग्रेसचे माजी गृहराज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांनी शिंदे सेनेशी घरोबा करण्याचा निर्णय घेतला असून येत्या 31 मे रोजी त्यांनी सुशीलकुमार शिंदे यांची साथ सोडून हातात धनुष्यबाण घेणार आहेत. राज्यात सत्ता परिवर्तनानंतर अनेक काँग्रेसी नेत्यांचे अर्थकारण बिघडले. त्यांचा रखडलेला 'विकास' प्रशस्त करण्यासाठी सत्ताधारी पक्षात जाणे हा एकमेव अंतिम पर्याय राहिला, तो म्हेत्रे यांनी निवडला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या तोंडावर ही भरती सुरू आहे. भाजपा, अजीत दादा गट देखील अपवाद नाही. प्रश्न एवढाच की ही भरती कितीपर्यंत फुगणार आहे. दरम्यान शिंदे सेनेत प्रवेश करण्यापूर्वी म्हेत्रेंनी हातात घड्याळ बांधून घेण्यासाठी चाचपणी केल्याचे समजते.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपा प्रवेशासाठी वेटिंगवर असलेले आ.भारत भालके आणि सिध्दाराम म्हेत्रे यांना तिकीट मिळाले नाही. भालके यांनी हात सोडून घड्याळ बांधले. आणि म्हेत्रेंना नाईलाजाने हाताच्या चिन्हावरच निवडणूक लढवावी लागली. अपेक्षेप्रमाणे हार पत्करली. त्यानंतर पुढील काळात त्यांची हालत गंभीर झाली. 2024 मध्ये देशात परिवर्तन झाले नाही, केवळ सुशीलकुमार कन्या प्रणितीताई खासदार झाल्या. पक्षातील अनेक काँग्रेसी नेते सैरभैर झाले. असून आता केवळ म्हेत्रे बाहेर पडले आहेत, त्यांच्यानंतर नजीकच्या काळात अन्य काँग्रेसी बाहेर पडले तर आश्चर्य वाटू नये. (सोलापूर मार्केट कमिटी निवडणुकीचा कौल काय सांगतो) आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या तोंडावर हे भरती अभियान असून सत्ता जिकडे, तिकडे चांगभलं हाच निकष.
हे ही वाचा... संबंधित बातम्या....
https://lakshyawedh.com/shivaraj-mhetre-sugrcane
माजी मंत्रीपुत्र शिवराज म्हेत्रेे अडचणीत
https://lakshyawedh.com/panjabbank-aakalkot-sugar
म्हेत्रेे आणि शिंदे परिवाराच्या प्रॉपर्टीचा ताबा; पंजाब बँकेची कारवाई
2024 विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर म्हेत्रेंच्या मातोश्री शुगर कारखान्याच्या उस बिलासाठी अक्कलकोट तालुक्यातील शेतकर्यांनी सोलापुरात काँग्रेस भवन आणि म्हेत्रे यांच्या निवासस्थानासमोर अर्धनग्न आंदोलन केले होते. हा प्रक़ार काँग्रेसच्या नेत्यांनीच घडवून आणला अशीही चर्चा होती. 2024 च्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे म्हेत्रे दुसर्यांदा पराभूत झाले. त्यानंतर मातोश्री शुगर कारखान्याच्या थकीत कर्जाच्या वसुलीसाठी त्यांच्या प्रॉपर्टीवर पीएनबी बँकेने जप्तीची कारवाई केली. शिवाय पुण्यात मुलगा शिवराज म्हेत्रे यांच्या प्रॉपर्टीवरही जप्ती आली. बिघडलेले 'अर्थकारण' आणि राजकीय भवितव्याचा विचार करून म्हेत्रेंनी धनुष्यबाण हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे.
What's Your Reaction?






