Ashadhi Wari : वारीतही एसटी भाविक वारकर्यांचा खिसा कापणार
१०%हंगामी तिकीट दरवाढ ३१जुलैपर्यंत;आषाढी संपल्यानंतर १३.५०%पुन्हा भाडेवाढ करण्याची योजना,उन्हाळा सुटीचा हंगाम संपला तरी हंगामी दरवाढीचा सोस का? डिझेलच्या किमती वाढल्याने महामंडळावर आर्थिक ताण पडल्याचा दावा, परिवहन मंत्री सरनाईक यांचा सतत नन्नाचा पाढा
(विजयकुमार पिसे)
मुंबई: उन्हाळी सुटीत हंगामी १०टक्के केलेली दरवाढ आषाढी वारीच्या काळातही कायम ठेवण्याचा एसटी महामंडळाचा फंडा भाविक वारकर्यांच्या खिसा कापण्यापर्यंत गेला आहे. ही दरवाढ येत्या ३१जुलैपर्यंत राहणार असून संपूर्ण राज्यभरातून येणार्या लाखो भाविकांना १०टक्के प्रवासी तिकीट दरवाढीचा फटका बसणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना विठुराया सद्बुध्दी देत नाही का? असा सवाल भाविक वारकर्यांनी उपस्थित केला आहे.
अमेरिका, इराण युध्दामुळे इंधन दरवाढ झाली. ही स्थिती दोन महिन्यापूर्वीची होती. तसेच उन्हाळी सुटीत प्रवासी गर्दीमुळे खाजगी ट्रॅव्हल्स गाड्या प्रवाशांचा खिसा कापतात, असा दावा करून एसटी महामंडळानेही गेल्या पाच वर्षांपासून उन्हाळी व दिवाळी सुटीत प्रवासी भाड्यात हंगामी १०टक्के दरवाढ करते. आता उन्हाळ संपला, पाऊसही सुरू झाला. पण महामंडळ डिझेल दरवाढीचा नाकर्तेपणाचा पाढा वाचून सामान्य एसटी प्रवाशांच्या खिशावर डल्ला मारतेय. त्यात भर पंढरपूरची आषाढी वारी. राज्यभरातून लाखो संख्येने भाविक एसटीने पंढरपूरकडे प्रस्थान ठोकतात. विठुरायाला गरिबांचा देव म्हटले जाते. पण कायम तोट्यातील एसटी महामंडळसाठी गरीब भक्तांच्या खिसा कापण्याचा खटाटोप आहे.
आताची दरवाढ उन्हाळी सुटीतील हंगामी काळासाठीची आहे. ती साधारणपणे १५ जूनपर्यंत असते. आषाढी वारीची संधी साधून (अर्थात संधीसाधू धोरण) ही दरवाढ ३१ जुलैपर्यंत वाढविली आहे. त्यानंतर १३.५० टक्के प्रवासी भाड्याची योजना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी बोलून दाखवली. शिवाय सुट्या पैशांची चणचण हे कारण सांगून प्रत्येक टप्प्याचे प्रवासी भाडे ५ रुपयांनी वाढवण्याची योजना असल्याचे समजते. अर्थात हा साधा हिशेब घातला तर १३.५० टक्के पेक्षा अधिक असू शकेल. इंधन दरवाढ हे कारण तद्दन खोटे असू शकते.
एसटी महामंडळ तोट्यात, चोर्यान्चा मामला व भ्रष्ट कुरण आणि कर्मचार्यांचे पगार यासाठी दरवाढीचा बोजा मात्र प्रवाशांवर. गाव तिथे एसटी. एसटीचा प्रवास सुरक्षित, महिलांना ५० टक्के सवलत,ज्येष्ठांना संपूर्ण तिकीट माफ ह्या सवलती आहेत, या सुविधा आहेत. पण सरसकट दरवाढ हे कारण न पटणारे आहे. यात अलीकडे नवीन भर पडलीय ती सफाई कराचे. प्रत्येक प्रवाशाकडून २ रुपयांचा स्वच्छता अधिभार. बसमध्ये त्याशिवाय तिकीटच फाडले जात नाही. या २ रु. सुट्या पैशांचा मामला तिथे येत नाही.
What's Your Reaction?