यंदा बकरी ईदला कायद्याचा दट्ट्या बसला! म्हणून...!!

विहिंपचे राष्ट्रीय प्रवक्ते शंकर जी गायकर यांचे रोखठोक भाष्य संस्कृतीचा स्वीकार व सन्मान हीच खरी राष्ट्रभक्ती; धर्मांतरणावर परखड विचार

Jun 19, 2026 - 22:18
 0  15
यंदा बकरी ईदला कायद्याचा दट्ट्या बसला! म्हणून...!!

सोलापूर :  यंदाच्या बकरी ईद काळात राज्य सरकारकडून कायद्याची अंमलबजावणी झाली. त्याचा दट्ट्या बसल्यामुळे बकरी ईदच्या दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहिली. प्रत्येक वेळी या सणाच्या काळात पशुधनाची बेकायदा अवैध वाहतूक, तस्करी, बेसुमार हत्या यांचा अवडंबर होतो. हिंदू समाजाला हेतुत: त्रास देऊन भावना दुखावण्याचा प्रकार होतो. त्याला आळा बसला. कारण  राज्य सरकारने कायद्यात असलेल्या तरतुदींची कार्यवाही केली, पोलीस प्रशासन देखील कठोर होते. त्यांनी कठोर भूमिका घेतली, असे रोखठोक भाष्य केंद्रीय सहमंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्ते श्री शंकर जी गायकर यांनी केले. 
   शंकर जी गायकर सोलापुरात आले असता त्यांनी अक्कलकोट येथे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना जिहादी घटकांकडून झालेली मारहाण, या निंदनीय प्रकाराबद्दल संबंधित गुन्हा दाखल झालेला आरोपी भाजपाचा नगरसेवक आणि अन्य आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली. तसेच यासंदर्भात मुख्यमंत्री आणि गृहमंत्रालयाकडे जाब विचारणार असल्याचे सांगितले. सोलापूर दौर्‍यात पत्रकारांशी संवाद साधताना प्रांत अध्यक्ष प्रा. गजानन धरणे, प्रांत गोरक्षा संवर्धनचे प्रमुख संतोष खामकर, प्रांत धर्माचार्य सहसंपर्क प्रमुख नागनाथ बोंगरगे, विभाग मंत्री विजयकुमार पिसे, सहमंत्री संजयकुमार जमादार, जिल्हामंत्री जयदेव सुरवसे, सहमंत्री विष्णू जगताप, बजरंग दल संयोजक अभय कुलथे, सहसंयोजक ऋषीकेश गंगदे आदी उपस्थित होते.
   श्री गायकर म्हणाले, भारताला जगद्गुरू होण्याचे स्वप्न पूर्ण करायचे असेल, तर समाजाला आपली स्वीकारशक्ती वाढवावीच लागेल. इंडोनेशियातील मुस्लीम समाज ज्याप्रमाणे आपल्या मुळांचा आणि सांस्कृतिक वारशाचा अभिमान बाळगत जय श्रीरामचा जयघोष करतो, तशीच व्यापकता भारतीय मुस्लीम समाजाकडूनही अपेक्षित आहे. संस्कृतीचा सन्मान ही केवळ धार्मिक बाब नसून ती खरी राष्ट्रभक्ती आहे, असे    प्रतिपादन विश्‍व हिंदू परिषदेचे केेंद्रीय सहमंत्री शंकर जी गायकर यांनी केले. 
   स्लॉटर हाऊसची सक्ती: सामाजिक स्वास्थ्याचा लढा, गोमांस आणि बेकायदा कत्तलींच्या मुद्द्यावर गायकर यांनी प्रशासकीय ढिलाईवर निशाणा साधला. स्वच्छता आणि पर्यावरण रक्षणासाठी स्लॉटर हाऊसची व्यवस्था असताना, अनेकांनी नियमांना केराची टोपली दाखवली होती. घराघरांत सुरू असलेल्या या बेकायदेशीर कृत्यांमुळे अनेकांना आपली घरे सोडून स्थलांतर करावे लागले. विश्‍व हिंदू परिषदेच्या रेट्यामुळे सरकारला जीआर काढून यंदा कडक सक्ती करावी लागली. कोणावरही अन्याय न करता केवळ कायद्याची अंमलबजावणी केल्याने आज अनेक शहरांत शांतता आहे, हेच आमच्या संघर्षाचे यश आहे, असे त्यांनी अधोरेखित केले. 
   कन्व्हर्जनचा कॅन्सर: संस्कारांवर आघात, सध्याच्या सामाजिक आव्हानांवर चिंता व्यक्त करताना श्री गायकर म्हणाले, लँड जिहाद आणि लव्ह जिहादच्या माध्यमातून आपल्या तरुणांना, विशेषतः मुलींना त्यांच्या मुळांपासून तोडण्याचे कारस्थान रचले जात आहे. धर्मांतराचा हा कॅन्सर समाजमनाला पोखरत आहे. संस्कार विसरून बाह्य प्रभावाखाली जाणारी युवा पिढी ही चिंतेची बाब असून, हे नॅरेटिव्ह मोडीत काढणे आता काळाची गरज बनली आहे.  युवा शक्तीचा महाराष्ट्र प्रथमचा निर्धार विश्‍व हिंदू परिषदेच्या विस्तारावर भाष्य करताना त्यांनी सांगितले की, रा. स्व. संघानंतर आज बजरंग दलाचे कार्यकर्ते राष्ट्र प्रथम हे व्रत घेऊन ठिकठिकाणी कार्यरत आहेत. नक्षलवादासारख्या हिंसक प्रवृत्तींना रोखण्यासाठी आमचे कार्यकर्ते त्यांच्याशी समरस होऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम करत आहेत. देशातील 70 हजार शाखांमधून आम्ही केवळ शाखा चालवत नसून एक राष्ट्रभक्त पिढी घडवत आहोत.  जगद्गुरू भारताचा मार्ग: त्याज्य ते टाकून, श्रेष्ठ ते स्वीकारून जे त्याज्य आहे ते सोडणे आणि जे श्रेष्ठ आहे ते स्वीकारणे, हाच भारताच्या प्रगतीचा मार्ग आहे. 57 मुस्लीम देशांमध्ये भारताच्या नेतृत्वाचा आदर होतो, कारण आपण संस्कृतीच्या मूळ तत्त्वांवर ठाम आहोत. त्यामुळेच, भारतीय मुस्लीम समाजालाही राष्ट्रीयीकरणाच्या प्रवाहात येण्यासाठी आपल्या सांस्कृतिक मुळांचा अभिमानाने स्वीकार करावाच लागेल, असे आवाहन गायकर यांनी याप्रसंगी केले. 

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow