मठ, मंदिर आणि समाजात वाद
सोलापूरमध्ये स्मशानभूमीच्या जागेवरून लिंगायत समाज, सिद्धेश्वर देवस्थान आणि बृहन्मठ यांच्यात वादाची चर्चा. या प्रकरणात राजकारणाचा आरोप होत असून समाजाने स्वाभिमानाने निर्णय घेण्याची गरज व्यक्त.
फोडा आणि झोडा ही इंग्रज निती. ब्रिटिश गेले. तोच पायंडा गेली 70 वर्षे काँग्रेसनं अवलंबिला. आता भाजपाचाही हाच पॅटर्न असावा. कारण आता भाजपात काँग्रेसीच अधिक. शिवाय तेच कर्तेधर्ते, धुरंधर*. स्मशानभूमीतही राजकारण करावं का?असा भाबडा सवाल बहुसंख्येने असलेल्या लिंगायत समाजाचा आहे. सिध्देश्वर देवस्थान आणि बृहन्मठ होटगी. हे दोन्ही या समाजाची व सोलापूरचीही श्रध्दास्थानं. या समाजाने स्मशानभूमीसाठी जागा मागितली. प्रशासनाने निर्णय घेतला. देखभालीसाठी देवस्थानला पाचारण केले. त्यांनी ना निर्णय घेतला, ना कळवला. प्रशासनाने पाठपुरावा केला. तरीही... बाहुबलीन्चा अट्टाहास का?
*मठ मंदिर आमची श्रध्दास्थानं
शेवटी नाईलाज झाला, प्रशासनाने होटगी मठाला पाचारण केले. त्यांनी होकार कळवला. विषय संपला. जागा देण्याच्या आणि देखभालीत वादाचा मुद्दाच नाही. पण आम्ही पक्के राजकारणी. शिवाय काँग्रेसी. जी सर्वांचीच श्रध्दास्थानं आहेत, त्या मठ आणि मंदिरात शिवाय लिंगायत समाजातही वाद पेटवून पोळी भाजण्याचा प्रकार आहे. यात कठपुतली कोण. कळीचा नारद कोण हे ज्याचे त्यांनी ओळखावेे.
..पण लिंगायत समाज असो वा मठ मंदिरांचे विश्वस्त. यांनी स्मशानभूमीच्या जागेचं निंद्य राजकारण होतंय हे ओळखावे. हा आपला अपमान. त्यामुळे स्वाभिमान गहाण टाकण्याऐवजी नकोच ती जागा. स्वखर्चाने जागा उपलब्ध करण्याची क्षमता निश्चितच या समाजात. शिवाय मठ आणि मंदिरामध्ये आहे.
What's Your Reaction?