कपात..पाणी, पाणीपट्टी आणि मनपा बजेटमध्येही?

सोलापूरमध्ये पाणीपुरवठा विस्कळीत असताना पाणीपट्टी कपातीची चर्चा रंगली. मनपा बजेट, पाणीप्रश्न आणि राजकारणामुळे नागरिक संभ्रमात.

Mar 22, 2026 - 12:39
 0  141
कपात..पाणी, पाणीपट्टी आणि मनपा बजेटमध्येही?

(विजयकुमार पिसे)
  शुक्रवारी सोलापूर मनपा सभेत सत्ताधारी भाजपामध्ये स्व*धुरंधर ठरवण्यासाठी आधी लठ्ठालठ्ठी, कुरघोडी आणि सभात्यागाने शेवट झाला. पण संयमी सोलापूरकर आणि मनपा प्रशासन संभ्रमात पडलेत हे नक्की. का?
     कारण सण हिंदूंचा गुढीपाडवा असो मुस्लिम बांधवांचा ईद. शिमगा ठरलेलाच  आहे. पाण्याचे वेळापत्रक एक दिवस पुढे गेल्याचे पत्रक शनिवारी रात्री मनपाने जारी केले आहे. शुक्रवारच्या सभेत 14 नगरसेवकांनी पाणी प्रश्‍न पेटवला, शेवटी ही लक्षवेधी पाण्यातच वाया गेली. तरीदेखील महापौर पाणी प्रश्‍नावर पुन्हा विशेष बैठक घेणार आहेत म्हणे.
देवाभाऊ, पाण्यासारखा पैसा..
 धरण तर उशाखाली. तीन दिवसाआड ऐेवजी पाच दिवस आणि आता सात दिवसांनी पाणी पुरवठा होतोय. त्यामुळे भाजपा शहराध्यक्षा तडवळकर यांनी सवाल केला, पाणीच नसेल तर पाणीपट्टीही नाही. अर्थात मनपाच्या अंतिम बजेटमध्ये पाणी पट्टीच्या उत्पन्नात सत्ताधारी भाजपा कपात करणार असाच निष्कर्ष निघू शकतो. आमचं (सत्ताधारी) असंच ठरलंय तर मनपाच्या उत्पन्नातही भर पडणार नाही. परिणामी (नगरसेवकांच्या वार्ड वाईज) विकास कामाला निधी कुठून उभं करणार? देवाभाऊ सोलापूरच्या पाण्यासाठी किती म्हणून पैसे ओतणार? इतकं करूनही पाणी खर्चाचं बजेट कोटींची उडाणं घेतच राहणार असं समजायला हरकत नसावी
निवडणुकीत जाहीरनामा. वचननामा नव्हे.
दररोज पाणी देतो म्हणून भाजपा सलग दुसर्‍यांदा प्रचंड बाहुबलीने सत्तेवर आली आहे. जाहीरनाम्यातही (वचननामा नाही) तसंच म्हटलंय. पुढील निवडणुकीत मतं मागायला येणार नाही, अशीही एक कुजबूज आहे. शेवटी निष्कर्ष एकच मनपा नियमित पाणी पुरवठा करणार नाही. त्यामुळे अनंत जाधवांनी रोकडा सवाल केला, महापौर कोंड्याल यांचा हा अवमान नाही का?
 संभाजीनगरचा पाणीपट्टी पॅटर्न
  मुद्दा तडवळकरांच्या पाणीपट्टी कपातीचा आहे. जनतेत आक्रोश नको त्यासाठी हा डाव आहे का? प्रॅक्टीकली पहायला गेलेे तर.. यापूर्वी उध्दव ठाकरे सरकारने छ.संभाजीनगर शहरामध्ये पाणीपट्टीत 50 टक्के कपात केलीच होती. तो पॅटर्न सोलापुरातही करायला हरकत काय? त्यामुळे सोलापूरकरांना दिलासा म्हणून हे अगदी  पक्कं ठरलंय असे समजूया. पुढील वर्षीच्या पाणीपट्टीत मनपा बजेटमध्ये 50 टक्के कपात होणार पक्कं?

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow