एकमेवाद्वितीय मोदी धुरंधर! नॉटआउट ८,९३१
मोदी युग :७ ऑक्टोबर २००१ पासून अखंड सेवा,कठोर परिश्रम आणि बांधिलकी,चार वेळा मुख्यमंत्री,तिसर्यांदा पंतप्रधान, भारतात दीर्घकाळ सरकार चालवणारे एकमेव
(विजयकुमार पिसे)
७ऑक्टोबर २००१ रोजी गुजरातचे मुख्यमंत्री ते आजतागायत सरकार चालवणारे, देशातच नव्हेे तर अखंड विश्वात एकमेवाद्वितीय धुरंधर नेतृत्व म्हणजे नरेंद्र मोदी. ८,९३१ दिवस अखंड सेवा,कठोर परिश्रम आणि अढळ बांधिलकी या त्रिसूत्रीवर चार वेळा मुख्यमंत्री,तिसर्यांदा पंतप्रधान, भारतात दीर्घकाळ सरकार चालवणारे नरेंद्र मोदीच होत. मोदींच्या या अखंड सेवाकार्याला *लक्ष्यवेध न्यूजच्या वतीने मानाचा मुजरा!*
नवी दिल्ली : भारतीय राजकारणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. सिक्कीमचे माजी मुख्यमंत्री पवनकुमार चामलिंग यांना मागे टाकत भारतात सर्वाधिक काळ सरकारच्या प्रमुखपदी राहण्याचा विक्रम मोदी यांनी प्रस्थापित केला आहे. पवनकुमार चामलिंग ८९३० दिवस मुख्यमंत्री होते. तर, मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री आणि पंतप्रधानपदाचा कार्यकाळ मिळून ८,९३१ दिवस पूर्ण केले आहेत. असे हे दुर्मिळ नेतृत्व अर्थात मोदी युगाची २५ वर्षे म्हणजे यंदा रौप्य महोत्सव आहे.
विशेष उल्लेखनीय म्हणजे पंतप्रधान मोदी गुजरातचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री म्हणून विक्रम अबाधित आहे. तसेच देशाच्या स्वातंत्र्यानंतर सलग तीन लोकसभा निवडणुका (२०१४, २०१९आणि २०२४) जिंकणारे ते पहिले पंतप्रधान आहेत. नरेंद्र मोदी ७ ऑक्टोबर २००१ रोजी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि २१ मे २०१४पर्यंत या पदावर होते. राष्ट्रीय राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी १२वर्षे, ७ महिने गुजरातचे नेतृत्व केले. जून २०२४मध्ये तिसर्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. सलग तिसर्यांदा विजय मिळवणारे ते पहिले बिगरकाँग्रेसी पंतप्रधान आहेत.
देशात सर्वाधिक काळ सरकारप्रमुख म्हणून मोदी यांनी कार्यरत राहणे हा सेवा, कठोर परिश्रम आणि अढळ बांधिलकी होय. मोदीजींच्या अनेक दशकांच्या सेवेने एक नवे युग घडवले आहे. गरिबांना त्यांचे हक्क मिळवून देणे, चौफेर विकास आणि जागतिक व्यासपीठावर देशाचा गौरव म्हणजे मोदीयुगाने भारताचा कायापालट केला आहे, पंतप्रधान म्हणून समर्पित नेतृत्व तसेच त्यांनी जीवनात अखंड सेवाच केली आहेे.
पंतप्रधान मोदी यांची आणखी एक विशेषतः म्हणजे डिजिटल क्षेत्रात अनेक टप्पे पार केले आहेत. त्यांच्या यूट्युब चॅनेलवर तीन कोटी सबस्क्रायबर्सचा टप्पा गाठला. यामुळे सर्वाधिक फॉलो केल्या जाणार्या जागतिक नेत्यांमधील त्यांचे स्थान अधिक बळकट झाले. फेब्रुवारीमध्ये मोदी यांनी इन्स्टाग्रामवर दहा कोटी फॉलोअर्सचा टप्पा ओलांडला.
What's Your Reaction?