उध्दवा अजब तुझे सरकार! विद्यमान सरकारलाच ठाकरे यांचा सवाल
विधान परिषदेतील निरोप समारंभाच्या भाषणात ठाकरे म्हणाले, मित्र कोण आणि शत्रू कोण; नाही भेटला असा कोणी, ज्याने मला छळले नाही!
(विजयकुमार पिसे)
उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेच्या निरोप समारंभाच्या भाषणात फडणवीस सरकारला उद्देशून उध्दवा अजब तुझे सरकार! असा मर्मभेदी सवाल ग.दि.मा.यांच्या कवितेचा संदर्भ देत केला. विधान परिषदेचे सदस्य असताना काय,काय कामे केली. राजकारणात कटू अनुभव आले याबाबत त्यांनी कवितेच्या माध्यमातून भूमिका मांडली.
उद्धव ठाकरे यांच्यासह ९ सदस्यांचा विधान परिषद सदस्यत्वाचा कार्यकाळ येत्या मे महिन्यात संपत आहे. या निमित्ताने निरोप समारंभ पार पडला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे उपस्थित होते. आपल्या भाषणात ठाकरे यांनी, उद्धवा, अजब तुझे सरकार! लहरी राजा, प्रजा आंधळी, अधांतरी दरबार! गदिमा यांच्या काव्यपंक्तीचा उल्लेख केला. विधीमंडळ सभागृहात व्यतित केलेले सदस्य ज्यामध्ये साहित्यिक, कवी,विचारवंत यांचा संदर्भ देत त्यांच्या कवितांचा आजच्या काळात लागू होत असलेले दाखलेे दिले. तसेच आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली. उद्धव ठाकरेंनी आपण मुख्यमंत्री म्हणून विधान परिषदेत आलो असल्याची आठवण सांगितली. तसेच त्यांनी आपल्या भाषणाच्या शेवटच्या मिनिटांत गदिमा, विंदा करंदीकर आणि सुरेश भट यांच्या कवितेतील ओळींचा दाखला देत आपली खंत देखील केली.
सध्याच्या राजकारणावर आसूड ओढत म्हणाले, आता लवकरच आयपीएल सामने सुरू होतील. त्यामध्ये तो खेेळाडू इकडे, कधी तिकडे. कधी कुणीकडे, असे सध्याच्या राजकारण्यांचे चित्र आहे. हे आयपीएल म्हणजे *इंडियन पॉलिटिकल लिग होय. सभागृहात विरोधी पक्षनेत्याची नियुक्ती होत नाही, याचा संदर्भ देताना विठ्ठलराव हांडे (इगतपुरी), पूर्वी याच सभागृहात हांडे विरोधी पक्षनेते होते. त्यावेळी पुरेसे संख्याबळ नव्हते. तरीही त्यांची नियुक्ती झाली. आता असे काय घडलं की सभागृहात विरोधी पक्षनेताच नियुक्त होत नाही, या शब्दात ठाकरे यांनी टोला लगावला.
विंदा करंदीकरांच्या कवितेचा संदर्भ देत शिंदे सेनेला टोला लगावला. केले कुणास्तव किती हे कधी मोजू नये. होणार त्याची विस्मृती त्याला तयारी पाहिजे, जो अनुभव मी घेतोय.
डोक्यावरी जे घेवूनी आजही इथे नाचती, घेतील ते पाय तळी त्याला तयारी पाहिजे. हे सगळं आयुष्य आहे. जे डोक्यावर घेऊन नाचतात, तेच एक दिवस पायदळी तुडवायला बघत नाहीत.
कवी सुरेश भट यांची एक कविता आहे, त्यातील मी चार ओळी मुद्दामून सांगतो. मित्र कोण आणि शत्रू कोण गणित साधे कळले नाही. नाही भेटला असा कोणी ज्याने मला छळले नाही. रुसून राहिले अगदी माझ्या जवळचे. पण मी कुणाला कळलोच नाही,
हे जरी खरे असले तरी मला जी संधी मिळाली त्यावेळी मी जे केलं ते प्रामाणिकपणे केलं. त्यामुळे महाराष्ट्राची जनता मला कुटुंबातील एक सदस्य मानते. मी या मायबाप जनतेला मानाचा मुजरा करुन आपल्या सर्वांचा या सभागृहात निरोप घेतोय, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
What's Your Reaction?