सर्वोदय,चाकोते नगरात 22 लाखाच्या निधीतून जलवाहिनी कामाचा शुभारंभ; आ.विजय देशमुखांनी घेतले संत गजानन महाराज पालखीचे दर्शन

सोलापूरातील प्रभाग क्र. ११ मधील सर्वोदय नगर व चाकोते नगर येथे आमदार विजय देशमुख यांच्या विशेष प्रयत्नातून महाराष्ट्र सुवर्ण जयंती अभियानांतर्गत १५.४३ लाख रुपयांच्या पिण्याच्या पाण्याच्या पाइपलाइन कामांचे लोकार्पण करण्यात आले. यानंतर त्यांनी सोलापूरात दाखल झालेल्या संत श्री गजानन महाराज पालखीचे दर्शन घेऊन वारकरी बांधवांचे स्वागत केले.

Jul 18, 2026 - 22:34
 0  3
सर्वोदय,चाकोते नगरात 22 लाखाच्या निधीतून जलवाहिनी कामाचा शुभारंभ; आ.विजय देशमुखांनी घेतले संत गजानन महाराज पालखीचे दर्शन

 सोलापूर : महाराष्ट्र सुवर्ण जयंती अभियान (जिल्हास्तर) योजने अंतर्गत सन 2025-26 आमदार विजय देशमुख यांच्या विशेष प्रयत्नातून प्रभाग क्र ११ सर्वोदय नगर भाग २ येथे तसेच चाकोते नगर येथे १५.४३ लाख विकास निधीतून  पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन टाकणे कामाचे लोकार्पण आ. विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते झाले.


सर्वोदय नगर भाग २  येथे रक्कम रु ६ लाख ६४ हजार  या विकास कामाचे लोकार्पण  याप्रसंगी करण्यात आले. तसेच महाराष्ट्र सुवर्ण जयंती अभियान (जिल्हास्तर) योजने अंतर्गत सन २०२५-२६ आमदार विजय देशमुख यांच्या विशेष प्रयत्नातून प्रभाग क्र ११ चाकोते नगर येथे येमूल पिठाची गिरणी ते व्यंकटेश गुंटूर घरापर्यंत पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन टाकणे (रक्कम रु १५ लाख ४३ हजार) या विकास कामाचेही लोकार्पण आमदार विजय देशमुख यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.
     याप्रसंगी शहर भाजपा चिटणीस मनोज कलशेट्टी, नगरसेवक अमर पुदाले, नगरसेवक शेखर इगे, मंडल अध्यक्ष सिद्धार्थ मंजेली, माजी सैनिक भीमाशंकर लोहार, सतीश भरमशेट्टी, बापू मस्के, नागेश गिरी, राजेश स्वामी, दीपक जाधव, श्रीनिवास सिद्राल, मल्लिनाथ हेबळे, मनोज ओतारी, श्रीशैल हुळ्ळे आदि  प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकारी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते.  

 संत गजानन पालखीचे घेतले दर्शन..
  आषाढी एकादशी निमित्त महाराष्ट्रभर सुरू असलेल्या पवित्र वारी सोहळ्यादरम्यान आज श्रीक्षेत्र शेगाव येथून पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या संत श्री गजानन महाराजांच्या पवित्र पालखीचे सोलापूर शहरात आगमन झाले. यावेळी आमदार विजय देशमुख यांनी संत श्री गजानन महाराजांना पुष्पहार अर्पण करून मनोभावे दर्शन घेतले तसेच पालखी सोहळ्याचे आणि वारकरी बांधवांचे स्वागत केले. याप्रसंगी संस्थेच्या वतीने आमदार विजय देशमुख यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला तसेच त्यांना शुभाशीर्वाद प्रदान करण्यात आले.  वारकरी संप्रदायाची भक्ती, समता आणि सेवाभावाची परंपरा जपत पंढरीच्या दिशेने मार्गक्रमण करणार्‍या या पवित्र सोहळ्यात आमदार विजय देशमुख यांनी सहभाग घेतला. विठ्ठल नामाच्या अखंड गजराने आणि भक्तिमय वातावरणाने सोलापूर नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow