आता मोबाईलवरून करता येणार आधार लिंक

नागरिकांची बँकेत जाण्याची कटकट कमी होणार

Sep 1, 2024 - 06:42
 0  145
आता मोबाईलवरून करता येणार आधार लिंक
Aadhar-pan-link

आधार लिंक करणे अगदी सोपे झाले आहे. मोबाईलवरुनच आता आधार लिंक करता येणार आहे. त्यामुळे बँकेत जाण्याची कटकट कमी होणार आहे.

राज्य सरकार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून 'लाडक्या बहिणीं'च्या खात्यावर अनुदान जमा करत आहे; मात्र अनेक बहिणींच्या खात्यांना आधार लिंक नसल्यामुळे अनुदान जमा करण्यास अडचणी येत आहेत. याची दखल घेत शासनाने आधार लिंक करण्यासाठी एनपीसीएल वेवसाईट सुरू केली आहे. त्या वेबसाईटद्वारे मोबाईलवरुनही आता आधार लिंक करता येणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी जिल्ह्यातून सहा लाखांपेक्षा जास्त अर्ज आले आहेत. त्यातील एक लाख २९ हजार महिलांचे आधार बँकेला लिंक नसल्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये अनुदान जमा करण्यात आले नाही, तर राज्यात हा आकडा मोठा आहे. मोबाईलवरुन आधार प्रमाणीकरण करण्यासाठी एनपीसीएलच्या माध्यमातून बँकेला आधार लिंक करता येणार आहे. लाखो महिलांना घरी बसून आधार प्रमाणीकरण करता येणार आहे..

असे करा आधार लिंक...

गुगल क्रोमवर जाणे, एनपीसीएल सर्च करणे, कंज्युमर सर्च करणे, भारत आधार सेडिग इनेबल दिसेल त्याला ओपन करणे, बँक खाते नंबर, इतर माहिती भरणे, त्यानंतर पासवर्ड दिसेल तो टाकणे, त्यानंतर सबमिट केल्यास आपले आधार लिंक होईल.

आधार प्रमाणीकरण नसल्यामुळे जिल्ह्यातील एक लाखापेक्षा जास्त महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अनुदानापासून वंचित राहिल्या आहेत. त्या महिलांनी मोबाईलवरुन आधार लिंक तत्काळ करावे. त्यानंतर त्यांच्या खात्यामध्ये अनुदान जमा होईल. 

- प्रसाद मिरकले, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जि.प. सोलापूर

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow