होशियार. .. ! आतापासूनच राजकीय पक्षांंचे सुरू सर्वे ...!!
होशियार. .. ! आतापासूनच राजकीय पक्षांंचे सुरू सर्वे ...!!

विशेष प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांमध्ये तयारी सुरू आहे. अनेक इच्छुक उमेदवार निवडणुकीसाठी आपला दावा पुढे करीत आहेत. या निवडणुका येत्या ऑक्टोबर महिन्यामध्ये होणे अपेक्षित असून आतापासूनच इच्छुकांच्या दावेदारीमुळे निवडणुका मोठ्या चुरशीने होतील असे दिसते. दरम्यान काही राजकीय पक्षांनी खाजगी एजन्सी मार्फत विधानसभा मतदारसंघांमध्ये सर्वेक्षणाचे काम हाती घेतले आहे. खाजगी एजन्सी मार्फत सुरू असलेले काम अपुर्या मनुष्यबळामुळे संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे या एजन्सीने स्थानिक कार्यकर्त्यांना हाताशी धरून सर्वेक्षण करण्याचा इरादा केला आहे. सोलापूर शहरात शहर उत्तर आणि शहर मध्य तसेच तसेच दक्षिण सोलापूर विधानसभा मतदार संघातील जुळे सोलापूर, विजापूर रोड, होटगी रोड, नई जिंदगी, नीलम नगर हा परिसर येतो. या तीनही मतदारसंघांमध्ये खाजगी एजन्सी मार्फत राजकीय पक्षांनी सर्वेक्षणचे काम सुरू केले आहे. संभाव्य उमेदवार, त्याचि तुलनात्मक ताकद, निवडून येण्याची क्षमता, सामाजिक संतुलन, आपली अनुकूल स्थिती, लोकसभा निवडणुकीत आलेला कौल यावर निवडणूक लढवणे आणि उमेदवारी निश्चित करणे याची सांगड घातली जाईल. दरम्यान सर्वेक्षण करणाऱ्या खाजगी एजन्सीकडे अपुरे मनुष्यबळ असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या एजन्सीने काही पक्षांच्या स्थानिक कार्यकर्त्यांना हाताशी धरून त्यांनाच सर्वेक्षणाला जुंपल्याचे लक्षात आले आहे. वास्तविक पाहता ही बाब गंभीर असून पक्षाचे आणि गटातटाचे कार्यकर्ते सर्वेक्षणात असतील तर त्यांच्याकडे तयार होणारा डाटा पारदर्शी राहील की नाही याविषयी साशंकता होता आहे. त्यामुळे या सर्वेक्षणावर कितपत विश्वास ठेवावा, हा प्रश्न आहे. या राजकीय पक्षांनी खाजगी एजन्सीकडे दिलेले काम कसे अचूक ठरेल याकडे लक्ष द्यावे लागेल. प्राप्त माहितीनुसार कोल्हापूर जिल्ह्यातील एका खाजगी एजन्सीला सर्वेक्षणाचे काम दिले असल्याचे विश्वसनिय सूत्रांकडून समजते. कोल्हापूर जिल्ह्यातील एक बडा नेता सोलापूर जिल्ह्यातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचे समजते, त्यासाठीच हि एजन्सी शहरात तळ ठोकून असल्याचे कळते. हे संभाव्य उमेदवार कोण आहेत, याविषयी कार्यकर्तां मध्ये मात्र चर्चा सुरू आहे.
What's Your Reaction?






