काका मला वाचवा, नव्हे....

काका मला वाचवा... हे मराठेशाहीच्या फंदफितुरीच्या काळातील घटना. महाराष्ट्राच्या राज/सत्ताकारणात आजही काकाचे स्थान टिकून आहे. त्यांचे वय किती हे मात्र विचारू नका. अजीतदादांचे काका शरद पवार साहेब अजूनही एकदम सक्रिय. त्यांच्याशिवाय राजकारणाचे पानही हलत नाही. सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणातही काकांना मानाचे पान आहे. हे काका म्हणजे वडाळ्याचे बळीराम काका साठे.

Jun 20, 2025 - 11:48
 0  9
काका मला वाचवा, नव्हे....

 (विजयकुमार पिसे)

   सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून काका साठे यांना खूप उशीरा संधी मिळाली. कारण अकलूजकरांपुढे ते क़धी झुकले नाहीत. शरद पवार काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदावरून त्यांना हटवलं. अकलूजकरांच्या खेळीला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील बळी पडले असावेत. पण काका साठे डगमगले नाहीत. त्यांनी बारामतीकर काकांशीच उभा दावा केला आहे. काका मला वाचवा म्हणून नव्हे. पुढील काळात काकांच्या हातात धनुष्यबाण की कमळ किंवा आणखी काही हे निश्‍चित नाही. पण त्यांनी नातवासाठी जि.प. नक्की केला आहे. हा नातू म्हणजे मनीष सुभाष देशमुख. 

     कारण काका साठे यांनीच जाहीर केले आपले पुढील पाऊल. काकांची उचलबांगडी करून परस्पर अकलूजकरांचा जिल्हा अध्यक्ष जाहीर केला आहे. त्यामुळे स्वाभिमानी काका आक्रमक झाले आहेत. बळीरामकाका साठे यांनी श.प.पार्टीला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासरशी धनुष्यबाण देण्यासाठी शिवसैनिकांनी काकांची भेट घेतली. त्यानंतर आमदार भाचे सुभाषबापू यांनीही काकांची भेट घेतली. या भेटीगाठीनंतरही काकांचे वेट अ‍ॅन्ड वॉच आहे. काका शब्दाला पक्के असल्यामुळे त्यांनी घाईघाईत कुणालाही गॅरंटी दिली नाही.

    पण जाता जाता काकांनी आपला निर्धार व्यक्त केलाय आमदार सुभाषबापूंचे पुत्र नातू मनीष देशमुख यांना जिल्हा परिषदेत पाठवायचे. उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी जिल्हा परिषद गट खुला असून तिथे बापूंच्या दक्षिण विधानसभा मतदारसंघातील दहा गावांचा समावेश आहे. कोंडी जि.प.चा गट मनीष देशमुखांसाठी सोडला तर म्हणजे एका आमदारपुत्राची जागा नक्की झाली. तालुक्यातील दुसरे माजी आमदार दिलीप माने यांनाही आपल्या मुलाला लॉन्च करायचे असेल तर पृथ्वीराज माने यांच्यासाठी एक जि.प. गट सुरक्षित ठेवावा लागेल. किंवा पंचायत समिती ठरली तर मानेंचा सभापतीपदासाठी दावा नक्कीच होणार. ही सुरवात आहे.

  मराठेशाहीच्या इतिहासातील काका मला वाचवा, ..... उदाहरण भूत/सर्वकालिन व वर्तमानकाळातही.....  

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow