देशमुख अँड देशमुख & सन्स

असाही पार्टी वुइथ डिफरन्स : ४० वर्षापासून कार्यरत कार्यकर्त्याची घेतली दखल

Oct 4, 2024 - 08:36
 0  1053
देशमुख अँड देशमुख & सन्स

सोलापूर : दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात मंगळवारी इच्छुक उमेदवारांसाठी बंद पाकीटातून नावे देण्यात आली. परंतु येथील काही कार्यकर्त्यांनी या प्रक्रियेत 'हात की सफाई' केली. आणि आपल्या नेत्याला खुश करण्याची संधी दवडली नाही. त्यामुळे इच्छुक अन्य उमेदवार, आणि पक्षाचे सक्रिय पदाधिकारी यांचा हिरमोड झाल्याचे दिसते. पुण्यातील भाजप आमदार सिद्धार्थ शितोळे (सरकार) यांच्या उपस्थितीत 105 पैकी 91 जणांनी आमदारकी कुणाला मिळावी हे मत बंद पाकीटातून कळवले. विद्यमान आमदार सुभाष देशमुख दोन टर्म लोकप्रतिनिधित्व करीत आहेत, विकास कामांसाठीही ते अग्रेसर आहेत. तिसऱ्यांदा पक्षाने संधी तर निवडणूक लढवू, किंवा कुणालाही संधी दिल्यास प्रामाणिकपणे पाठीशी राहून निवडून आणू, अशी ग्वाही त्यांनी होटगी येथील कार्यक्रमात पत्रकारांशी बोलताना दिली. दरम्यान बंद पाकिटातून उमेदवारी निश्चित करण्याच्या या प्रक्रियेत अनेक कार्यकर्त्यांनी सुभाष देशमुख यांनाच पसंती दिल्या चे कळते. देशमुख यांच्या विरोधात पंधरा दिवसांपूर्वी पाच नगरसेवकांनी बंड करून पक्षात प्रवेश केला नाही, असे सोमनाथ वैद्य यांना पाठिंब्याची पत्रे बहाल करून आ. देशमुखां विरोधात रोष व्यक्त केला, शिवाय अनेक नगरसेवक नाराज आहेत. आम्हाला विश्वासात घेत नाहीत म्हणून जाहीरपणे आपली भूमिका स्पष्ट करतात. असे असतानाही पाकीटात देशमुख यांचेच नाव आघाडीवर होते. परंतु या प्रक्रियेत कार्यरत पदाधिकाऱ्यांनी आमदारांची मर्जी राखण्यासाठी देशमुख यांच्याशिवाय त्यांचे सुपुत्र मनीष आणि रोहन देशमुख यांचे नाव सुचवा, असेच निरोप दिले. त्यामुळे भाजपात "देशमुख अँड देशमुख अँड सन्स" पॅटर्न प्रस्थापित केला. वास्तविक प्रत्येक पदाधिकाऱ्याला पसंतीचे तीन नावं लिहून बंद पाकीट मतदान करावे अशी ती प्रक्रिया.

 देशमुख यांना मतदार संघातून होणारा विरोध लक्षात घेता पदाधिकाऱ्यांनी त्यांचे नाव नसेल तर सुपुत्र मनीष देशमुख आणि कदाचित यांचाही विचार झाला नाही रोहन देशमुख असे पर्याय सुचवले. वास्तविक भाजपा पार्टी वुईथ डिफरन्स अशी प्रतिमा असलेला पक्ष. पण तू डिफरन्सचा अर्थ असा नव्हे की, माझा नेता नसेल तर त्यांच्याच मुला़ंचा संधी.

 ही अनपेक्षित मतनोंदणी प्रक्रिया जेव्हा अन्य इछुकांना कळाला, तेव्हा त्यांनाही धक्का बसला. त्यामुळे दक्षिण सोलापुरात सुभाष देशमुख नसतील तर कुणी अन्य इच्छुक ज्यांची नावे सध्या चर्चेत आहेत. त्यांना अजिबात संधी नाही असाच संदेश या प्रक्रियेतून गेला आहे. दरम्यान पक्षाचे एक उपाध्यक्ष इच्छुक असून उमेदवारीसाठी मतदारसंघात संपर्क सुरू केला आहे. शिवाय ते पक्षाचे पदाधिकारी देखील आहेत. त्यांना या मतदानासाठी पाचारण केलं नाही किंवा निरोपही दिला नाही. त्यामुळे त्यांची स्वतःची इच्छा असूनही त्यांना स्वतःचे नाव या प्रक्रियेतून आले नाही. ही गडबड पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून झाली असून आपल्या नेत्याच्या खुशमस्करीसाठी ते कोणत्याही थराला जातात हा अनुभव आहे. पार्टी वुईथ डिफरन्सला छेद देणारा आहे. पण या प्रकारानंतर सोलापुरात "देशमुख अँड देशमुख अँड सन्स" शिवाय पर्याय नाही असाच संदेश गेला, असे मानले जात आहे.

देशमुख आणि हम पांच..

 पुणे विभाग पदवीधर विधान परिषद मतदार संघाच्या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार संग्राम देशमुख (सांगली) होते. ते जेव्हा प्रचाराला सोलापुरात आले, तेव्हा या मतदारसंघात भाजपाचे पाच देशमुख आहेत अशी माहिती पुढे आली. स्वतः संग्राम देशमुख, जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, शहराध्यक्ष विक्रम देशमुख,सहकार मंत्री सुभाष देशमुख आणि पालकमंत्री विजय देशमुख. असे 'हम पाच' पांडव होते. त्या निवडणुकीत मविआचे अरुण लाड विजयी झाले होते. या ठिकाणी दोन वेळा चंद्रकांतदादा पाटील निवडून आले होते.

...असाही सुखद धक्का

दक्षिण सोलापुरातील राजूर गावचे माजी उपसरपंच सुरेश मळेवाडी यांना मत नोंदवण्यासाठी डाक बंगल्यात येण्यास उशीर झाला होता. एव्हाना मतदान प्रक्रिया पूर्ण झाली होती. मळेवाडी भाजपा स्थापनेपासूनचे ४० वर्षे निष्ठावान कार्यकर्ते, ही बाब लक्षात घेऊन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी श्री. मळेवाडी यांचे मत नोंदवूनच मतदान बंद पाकीट प्रक्रियेवर सीलबंदचीक्ष मोहोर लावली. ही आहे पार्टी वुईथ डिफरन्स. त्याचा सुखद धक्का कार्यकर्त्यांना अनुभवता आला....

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow