हा सोलापूरकरांच्या खिशावर डाका; निलंबनावरून नरोटे,शिंदे आक्रमक

सोलापूर महापालिकेतील निलंबनाच्या कारवाईवरून काँग्रेसचे चेतन नरोटे आक्रमक झाले असून त्यांनी भाजपवर भ्रष्टाचार झाकण्यासाठी दडपशाही केल्याचा आरोप केला आहे. “भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करणार होतो म्हणूनच कारवाई झाली,” असा दावा त्यांनी केला. शिवसेनेचे अमोल शिंदे यांनीही पाठिंबा देत जनतेच्या हक्कासाठी आवाज सुरूच ठेवण्याचा इशारा दिला. करवाढीला विरोध करत “सोलापूरकरांच्या खिशावर डाका टाकू देणार नाही,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

Apr 21, 2026 - 11:16
 0  4
हा सोलापूरकरांच्या खिशावर डाका; निलंबनावरून नरोटे,शिंदे आक्रमक

सोलापूर :  महापालिकेत भाजपच्या भ्रष्टाचारावर आवाज उठवणाऱ्यांना गप्प करण्याचा प्रयत्न असून सोलापूरकरांच्या खिशावर डाका, या शब्दात निलंबनावरून चेतन नरोटे आक्रमक झाले आहेत.
  भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करणार होतो, म्हणूनच आमच्यावर निलंबनाची कारवाई केली, असा नगरसेवक चेतन नरोटे यांचा आरोप आहे. भाजपच्या कथित भ्रष्ट कारभाराचा पर्दाफाश करण्याचा प्रयत्न केल्यामुळेच निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. जनतेचे प्रश्न मांडणाऱ्या लोकप्रतिनिधींना गप्प बसवण्यासाठी सत्ताधारी भाजपकडून दडपशाही सुरू आहे. 
     जनतेच्या हक्कासाठी आवाज उठवत राहणार. शंभर वेळा निलंबित केले तरीही आम्ही गप्प बसणार नाही, असे काँग्रेसचे चेतन नरोटे, शिवसेनेचे अमोल शिंदे म्हणाले.
   करवाढीच्या मुद्द्यावर टीका करताना  सोलापूरकरांच्या खिशावर डाका टाकणारी कोणतीही करवाढ आम्ही होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. महानगरपालिकेला दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर नेण्याचे काम भाजप करत आहे. चुकीच्या धोरणांमुळे आणि भ्रष्ट कारभारामुळे शहराची आर्थिक घडी विस्कटली आहे, असा आरोपही नरोटे यांनी यावेळी केला.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow