मारकडवाडी पार्ट 2 जंतर-मंतरवर
बॅलेट पेपरसाठी आ.जानकर,तिस्ता सेटलवाड, कोळसे पाटील, बच्चू कडू सहभागी, जिल्हाधिकार्यांनी बांगला देशातील स्थितीकडे वेधले होते लक्ष

विधानसभा निवडणूक निकालानंतर देशाच्या नकाशावर आलेल्या मारकडवाडीचा आता पार्ट 2 सुरू होणार आहे. माळशिरसचे पवार गटाचे आ.उत्तम जानकर यांनी आमदारकीचा राजीनामा निवडणूक आयोगाकडे दिला आहे. (वस्तुत: राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सुपूर्द केला पाहिजे. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या जो मंजूऱ होणार नाही.) त्यांच्या राजीनामा पत्रात बॅलट पेपरवर पोटनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. त्यामुळे हा स्टंट असल्याची चर्चा असून जानकर जंतरमंतरवर सत्याग्रह करणार आहेत.
माळशिरस विधानसभा मतदारसंघातून उत्तम जानकर यांनी विद्यमान भाजपा आ. राम सातपुते यांचा पराभव केला. याबद्दल पराभूत उमेदवाराचीही काही तक्रार नाही. पण मारकडवाडीत सातपुते यांना जानकरांपेक्षा सर्वाधिक मते मिळाली. इव्हीएम घोटाळा झाला, अशी जानकर यांची तक्रार आहे. इव्हीएम विरोधात देशभर चळवळ उभी करण्याचा विडा इंडी आघाडीने उचलला असून आ.जानकर यांनी शनिवारी १८ जानेवारीला राजीनामा सुपूर्द करून चर्चेला तोंड फोडले आहे. जंतरमंतरवर न्या.बी.जी.कोळसे पाटील, वादग्रस्त समाजसेविका तिस्ता सेटलवाड, बच्चू कडू, संविधान बचावचे राजू परूळेकर आंदोलनात सहभागी आहेत.
या वादाची ठिणगी पडली तेव्हा मारकडवाडीत जानकर समर्थकांनी बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याचा प्रयत्न निवडणूक आयोगाने हाणून पाडला. त्यानंतर धानोरे गावातूनही अशीच तक्रार पुढे आली, असे नमूद करून आ.जानकर यांनी संपूर्ण मतदारसंघात पुन्हा बॅलेट पेपरवर मतदान घेणे किंवा व्हीव्ही पॅटमधून चिट्ठी हातात घेउन ती मतदारांच्या हाताने व्ही व्ही पॅटमध्ये टाकणे अशा प्रकारे फेरमतदान घ्यावे, त्यासाठी आमदार पदाचा राजीनामा देत असल्याचे आ.जानकर यांनी पत्रात नमूद केले आहे. दरम्यान मारकडवाडीत बॅलेट पेपरवर मतदानाचा प्रयत्न हाणून पाडल्यानंतर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पत्रकार परिषदेत गंभीरपणे लक्ष वेधले होते. ते म्हणाले होते की, मारकडवाडी प्रकरणात बांगला देशसारखी परिस्थिती निर्माण झाली असती, या मागे काही जणांचा हेतू वेगळा आहे. त्यामुळे आता जंतरमंतरवर होणारे आंदोलन गंभीर आहे की स्टंट, अशी चर्चा आहे. दुसरी बाजू म्हणजे या आंदोलनातील सहभागी होणार्या मंडळींविषयी देखील शंका आहे. तिस्ता सेटलवाड यांचा सहभाग तसा निर्देश करतो.
What's Your Reaction?






