...म्हणून वाले, सपाटे, कोठे परिवाराचा हा पॅटर्न!

नेत्यांची मुले, पुतणे यांचे भवितव्य "हाता"त नाही

Jan 5, 2025 - 12:20
 0  611
...म्हणून वाले, सपाटे, कोठे परिवाराचा हा पॅटर्न!

 (विजयकुमार पिसे)

भाजपाच्या बालेकिल्ल्यात धक्का देऊन प्रकाश वाले 1992 मध्ये सर्वप्रथम नगरसेवक झाले. 1997 मध्ये पुन्हा संधी मिळाली. वाले यांच्या घराण्याचा वारसा वगैरे नाही. त्यांच्या विजयात भाजपाचाही "हात" होता म्हणे. हा "हात" आता प्रकाश वाले यांच्या पुढच्या पिढीला नकोय. म्हणून आपल्या मुलासाठी (प्रवीण) वाले यांनी काँग्रेसचा हात सोडण्याचा निर्णय घेतला. (यामुळे फक्त एका काँग्रेसीने खळखळ केली.) हाच पॅटर्न सपाटे यांचे पुतणे ज्ञानेश्‍वर. आणि सहा महिन्यापूर्वी हा प्रयोग देवेंद्र कोठे यांनी केला आणि चक्क सहा महिन्यात ते आमदारही झाले. (म्हणून अनेकांचा कल झुकला आहे)

    नेत्यांची मुले, पुतणे यांना आपले भवितव्य घडवायचे आहे. सव्वाशे वर्ष पार झालेल्या काँग्रेसमध्ये (पवारांचीही काँग्रेस) परिवारवाद चिकटलाच आहे. पण सगळ्याच नेत्यांच्या नशिबात संधी नाहीय, म्हणून "हात" दाखवून अवलक्षण करून घेण्यापेक्षा चिखलातल्या "कमळात" आपले भवितव्य साधण्याचा दूरदृष्टी प्रयोग सुरू आहे). मात्र अचूक टायमिंग आणि नशिबाची साथ असेल तरच). चांगले मार्गदर्शक आणि नेतृत्वाचा विश्‍वास असला की कोठेंचा देवेंद्र पहिल्याच झटक्यात आमदार होतो. ते भाग्य काका महेश कोठे यांच्या वाट्याला आले नाही. असो....!

    2017 च्या सोलापूर महापालिका निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर मी ग्राउंड लेव्हलवर सर्वे करत असताना प्र.क्र. 8 या संवेदनशील प्रभागात प्रकाश वाले आणि राजशेखर हिरेहब्बू हे किंवा त्यांच्या परिवारातील सदस्य लढतील हे अपेक्षित होते. सुशीलकुमार शिंदे यांची मोठी ताकद उभयतांच्या पाठिशी होतीच. स्वत: वाले शहराध्यक्ष होते. प्रवीण वाले यांची उमेदवारी सहजशक्य होती. पण रिस्क नको म्हणून अध्यक्ष वाले यांची तयारी दिसली नाही. हिरेहब्बू यांना सिध्दरामेश्‍वरांचा कौल मिळाला नाही. म्हणून त्यांचीही तयारी दिसली नाही. सत्ताधारी काँग्रेसची अशी अवस्था माझ्या सर्वेत 2017 च्या महापालिका निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीने नांगी टाकल्याचे चित्र होते. विशेष म्हणजे हे पक्ष कायमच सत्तेत होतेे. असायचे. असा तो काळ.

    आणि त्यानंतर आज सात आठ वर्षानीही हीच घसरण सुरू आहे. (प्रणिती शिंदे खासदार झाल्या, त्याची कारणे वेगळी आहेत) त्यामुळे मुलाच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वाले यांनी काँग्रेसच्या अस्तित्वावर झगझगीत (प्रक़ाश) टाकला. त्यांनी पक्षाचा राजीनामाही देऊन टाकला. सपाटे पक्षनिष्ठ नव्हे, व्यक्तीनिष्ठ. पवार साहेब जिकडे, सपाटे तिकडे. साहेबांच्या आणि सपाटेंच्या परिवारातही आता "राम" राहिलेला नाही. (म्हणून अजीतदादा बाहेर पडले आणि सहाव्यांदा उपमुख्यमंत्री झाले.) आता सपाटेंचे पुतणे ज्ञानेश्‍वर हे देखील भाजपाच्या वाटेवर आहेत, अशी चर्चा असून मनोहरपंतांनी त्यास पुष्टी दिली आहे. एकनिष्ठ पंत साहेबांबरोबरच राहणार. सपाटेंच्या घरातही आलबेल नाही. तात्या कोठे यांना सुशीलकुमार शिंदे यांनी आमदारकीची संधी डावलल्यानंतर महेश कोठे यांनी भाजपात जाण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना योग्य मार्ग ....मिळाला नाही, त्यामुळे ते शिवसेनेत गेले. तरीही भाजपा परिवाराची कोठे यांना सहानुभूती होती, पण ती (2014) आमदारकी जिंकण्यात परावर्तित झाली नाही. म्हणून 2009 पासून त्यांची नाव कधी इकडे तर कधी तिकडे. अशीच परफट काकांमुले देवेंद्र कोठे यांचीही. संघ परिवारातील मंडळींनी नेमकेपणाने हेरून त्यांना कानमंत्र दिला. (देवेंद्र)दादा हवाय, (महेश) काका नको. आणि देवेंद्रनी अचूक टायमिंग साधले.   

    या विधानसभा निवडणुकीत असे दोन प्रयोग फसले....

विधानसभा निवडणुकीत दोन नातवांचे लॉचिंग झाले. पण दोन्ही नातवांचे प्रयोग फसले. बड्या नेत्यांच्या परिवाराचे लवकर कल्याण होते. उज्वलाताई शिंदे, प्रणिती शिंदे यांच्यानंतर नातू शिखर पहारिया. पण *"लक्ष्यवेध न्यूजने नॅरेटिव्ह"* चालवला. "ते शिखरावर, आणि आम्ही!" आणि 24 तासात नातू पहारिया शिखरावरून उतरले. (शिंदे परिवाराचा खुलासा आला, पहारिया लढणार नाही) अन्यथा तेच शहर मध्यचे आमदार! दक्षिण सोलापुरात असाच प्रयोग घाटत होता. पवार/शिंदे यांचा तो प्रयोग फसला. (की फसवला).

2012 पासून भाजपात प्रयोग....

     2010 दशकात भाजपाच्या एका अभ्यास वर्गात मी "इनकमिंगचा" विषय मांडला होता. काँगेसी नेत्यांची मुले, पुतणे आणि अन्य हे अस्वस्थ आहेत. भाजपाचा (वर्तुळ) परिघ वाढवायचा असेल तर या इनकमिंगला सोबत घ्या! सोलापुरातच संघटनमंत्री रवीजी भुसारी, विनोद तावडे (तावडे तेव्हा प्रदेश सरचिटणीस होते) यांनी पक्षाच्या बैठकीत काँग्रेसी आणि रा.काँ. व अन्य पक्षांच्या नेत्यांच्या परिवाराकडे लक्ष वेधले होते. पक्ष विस्तारासाठी त्यांना भाजपात आणण्याचे आवाहन केले होते. आणि अपेक्षेप्रमाणे भाजपाचे परिघ वाढल्याचे लक्षात येईल. आपली रेष मोठी करा... म्हणजे.....समोरची रेष छोटी होईल.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow