टीम रावसाहेब दानवे विधानसभेसाठी सज्ज

टीम रावसाहेब दानवे विधानसभेसाठी सज्ज

Sep 11, 2024 - 06:43
 0  123
टीम रावसाहेब दानवे विधानसभेसाठी सज्ज
रावसाहेब दानवे

सोलापूर: येत्या नोव्हेंबर महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. सर्वच राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरू असून भाजपाने यामध्ये आघाडी घेतली आहे. केंद्रीय निवडणूक समितीने माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची विधानसभा निवडणूक संयोजक म्हणून नियुक्ती केली असून त्यानंतर लगेचच दानवे य़ानी आपली टीम तयार केली आहे. 

 विधानसभा निवडणूक व्यवस्थापन समितीमध्ये अनुभवी कुशल नेत्यांची फळी आहे. वीस जणांच्या टीममध्ये विधानसभा संयोजक, सहसंयोजक यांच्यासह विविध समित्या गठीत केल्या आहेत. लोकसभा निवडणुकावेळी जी नेतेमंडळी या व्यवस्थेच्या बाहेर होती, त्यांना दानवे यांच्या टीम मध्ये संधी मिळाली आहे. यामध्ये पंकजा मुंडे, मुरलीधर मोहोळ, अशोकराव चव्हाण, विखे पाटील, विजयकुमार गावित, दिलीप कांबळे, विजय गिरकर, अशोक नेते, रक्षा खडसे, रवींद्र चव्हाण, निरंजन डावखरे, अतुल भातखळकर यांचा समावेश आहे. 

या समित्यांमध्ये प्रामुख्याने जाहीरनामा समिती, विशेष संपर्क समिती, संपर्क विभाग, सामाजिक संपर्क समिती, महिला, युवा, प्रचार यंत्रणा, सहकार क्षेत्र संपर्क समिती, कृषी क्षेत्र संपर्क समिती, लाभार्थी संपर्क समिती, अनुसूचित जाती, जमाती, सोशल मीडिया, महायुती निवडणूक अभियान समन्वय समिती, चुनाव आयोग संपर्क, ग्रामीण व शहरी स्थानिक स्वराज्य संस्था संपर्क या़ंचीही विशेषत्वाने दखल घेऊन ती गठीत केली आहेत.

 प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचीही पक्ष स्तरावर यंत्रणा कार्यरत राहणार आहे. मात्र रावसाहेब दानवे यांची विधानसभा निवडणूक व्यवस्थापन समिती यांच्या नेतृत्वा खाली समांतर निवडणूक यंत्रणा राहणार आहे. त्यामुळे या समितीचे विशेष महत्त्व अधोरेखित झाले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow