बिल्डर थेपडे भागीदार असलेल्या प्रॉपर्टीचा ई लिलाव
8.75 कोटी वसुलीसाठी इंडियन बँकेकडून पिरॅमिड एंटरप्राजयेसवर कारवाई

(विजयकुमार पिसे)
सोलापुरातील प्रसिध्द बिल्डर अमित अशोक थेपडे भागीदार असलेल्या पिरॅमिड एन्टरप्रायजेसने कर्ज न फेडल्यामुळे इंडियन बँकेनेे जामीनदार/भागीदार विलास अटल यांची प्रॉपर्टी ताब्यात घेतली आहे. 8.75 कोटी वसुलीसाठी ई लिलाव पुकारल्याचे नमूद केले आहे.
सोलापुरातील पनाश अपार्टमेंटचे प्रकरण विविध कारणांनी चर्चेत आहे. बिल्डर थेपडे पिरॅमिड एंटरप्रायजेसमध्ये भागीदार/जामीनदार आहेत. इंडियन बँकेने प्रॉपटींचा प्रतीकात्मक ताबा यापूर्वीच घेतला आहे. पिरॅमिड एंटरप्रायजेसमध्ये थेपडे आणि विलास माधव अटल हे बिल्डर उद्योजक आहेत. या प्रकरणात ई लिलाव करण्याची नोटीस बँकेने बजावली आहे. विलास अटल यांच्या मालकीच्या गॅलक्सी वन या कंपनीच्या नावाने खराडी जवळील 769 चौ. फुट जागेची मालमत्ता आहे. आता येत्या 21 फेब्रुवारी 2025 रोजी ई लिलाव पुकारणार आहे. तसेच मे.हिमालय ट्रेडलिंक्समध्येही अटल भागीदार आहेत. या कंपनीची स्थावर मालमत्ता इंडियन बँकेने ताब्यात घेतली आहे. ही रक्कम 5.38 कोटी आहे. त्यामध्ये अटल यांचे सहकारी कोतवाल हे देखील जामीनदार/भागीदार आहेत. मार्च एंडिंगमुळे बहुतेक बँका कर्ज प्रकरण वसुलीसाठी धडक कारवाई करतात. त्यापैकीच हा एक प्रकार आहे.
What's Your Reaction?






