"कार्यकर्ता कसा असावा ? त्यांच्या मध्ये कोणते गुण असावे

श्री जिव्हेश्वर विद्यार्थी विकास मंचच्या वतीने कार्यकर्ता मेळावा व सभेचे आयोजन

Jul 31, 2024 - 23:35
 0  137
"कार्यकर्ता कसा असावा ?   त्यांच्या मध्ये  कोणते गुण असावे
श्री जिव्हेश्वर विद्यार्थी विकास मंचच्या वतीने कार्यकर्ता मेळावा व सभेचे आयोजन

श्री जिव्हेश्वर विद्यार्थी विकास मंच आयोजित कार्यकर्ता मेळावा  व सभेचे आयोजन  विवेकानंद केंद्र जुळे सोलापूर  येथे  करण्यात आले  या कार्यक्रमात पदाधिकारी व कार्यकर्ते मिळून 40 जणांनी सहभाग घेतला. 

कार्यक्रमाचे उदघाट्न  जिव्हेश्वर प्रतिष्ठान चे कार्याध्यक्ष डॉ. चंद्रशेखर बारगजे  यांच्या हस्ते दीपप्रज्वलाने करण्यात आले.  यावेळेस व्यासपीठावर मंचचे अध्यक्ष कृष्णा सुरे सर उपाध्यक्ष डॉ. प्रा.चंद्रशेखर टोणपे तसेच विवेकानंद केंद्राचे कार्यकर्ते व योगशिक्षक धनंजय सूर्यवंशी उपस्थित होते.  

 धनंजय सूर्यवंशी यांनी  "कार्यकर्ता कसा असावा ?   त्यांच्या मध्ये  कोणते गुण असावे हे अत्यंत सरळ व साध्या शब्दांमध्ये समजून सांगितले व तसेच कार्यकर्ता हा स्व: प्रेरित असावा हे त्यांनी सांगितले 

डॉ. बारगजे यांनी त्यांच्या जीवनातले चढउतार तसेच काही अविस्मरणीय क्षण सांगितले तसेच  कार्यकर्ता म्हणून सामाजिक कार्याचा आज पर्यंतचा प्रवास स्व अनुभवाचे दाखले देत कार्यकर्त्यांन समोर उलगडला. 

दुसऱ्या  सत्राच्या सुरुवात  प्रेरणादायी गीताने झाली.  रौप्य महोत्सव वर्षा निमित्त माजी विद्यार्थी स्नेह मेळावा घेण्याबाबत चर्चा झाली.  हा कार्यक्रम नोव्हेंबर २०२४ मध्ये सोलापुरात घेण्याचे निश्चित झाले   कार्यक्रमाचे स्वरूप कसे असावे माजी विद्यार्थ्यांची नोंदणी कशी करावी या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. श्री जिव्हेश्वर विद्यार्थी विकास मंच, सोलापूर आणि श्री जिव्हेश्वर प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने  अखिल भारतीय स्वकुळ साळी साहित्य संमेलन सोलापूर येथे घेण्याचे ठरेल असून त्याची पूर्व तयारी कशी करावी. या संदर्भात चर्चा झाली
 
 या सभेमध्ये संस्थेचे अध्यक्ष सुरे, डॉ. बारगजे, डॉ टोणपे, दत्तात्रय गायकवाड, अनुराधा काजळे ,संतोष सपकाळ ,अमृत ढगे ,शिवानी एडके, संदीप सरवदे, शुभांगी एकबोटे, दीपाली एकबोटे  यांनी तसेच कार्यकर्त्यांनी देखील उत्साहाने  चर्चेत सहभाग घेतला.  या सभेस  जेष्ठ पत्रकार विजयकुमार पिसे यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ईश्वरी माळवदकर हिने केले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow