अहमदाबादमध्ये प्लेन क्रॅश; विमानात 242 प्रवासी

(लक्ष्यवेध विशेष न्यूज बुलेटिन)अपघातात मोठी जीवितहानीची शक्यता; विमान इमारतीवर कोसळले आणि आगीचा मोठा स्फोट झाला.

Jun 12, 2025 - 17:23
 0  438
अहमदाबादमध्ये प्लेन क्रॅश; विमानात 242 प्रवासी

अहमदाबाद : अहमदाबादमध्ये मोठी विमान दुर्घटना घडली असून तब्बल 242 प्रवाशांना घेऊन जाणारे प्रवासी कोसळले आहे. हे विमान लंडनसाठी उड्डाण केले होते. मात्र, दुपारी 1.31 वाजता केलेल्या उड्डाणानंतर तीन मिनिटांतच विमान एका इमारतीवर कोसळले.या अपघातात मोठी जीवितहानीची शक्यता आहे. 

   दुर्घटनेनंतर काही वेळातच 3 अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. सध्या, एनडीआरएफचे पथक आणि प्रशासनाकडून युद्धपातळीवर बचावकार्य आहे. 

   या विमानातून गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे देखील प्रवास करत होते, अशी प्राथमिक माहिती आहे. विमान दुर्घटनेनंतर गृहमंत्री अमित शाह यांनी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना फोन करुन माहिती घेतली. 

   जिथे प्लेन क्रॅश झालं, त्याठिकाणी धुराचे मोठे लोळ पसरल्याचं व्हिडिओतून दिसून येत आहे, घटनास्थळी विविध बचाव पथक दाखल झाले आहेत. मात्र, या दुर्घटनेत मोठी जिवितहानी झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अपघातानंतर दुर्घटनास्थळी मोठा स्फोट झाला, अशीही माहिती आहे.

    विमानाने दुपारी 1.31 वाजता उड्डाण केल्यानंतर 1.38 मिनिटांनी विमानाचा शेवटचा सिग्नल मिळाला होता. मिळालेल्या माहितीनुसार विमान ज्या रुग्णालयावर कोसळलं त्या रुग्णालयातील 15 डॉक्टर जखमी झाले असून काही रुग्णांना देखील गंभीर दुखापत झाल्याची माहिती आहे. विमानात 169 भारतीय, तर 53 ब्रिटीश नागरिक

एअर इंडियाच्या दुर्घटनाग्रस्त प्रवासातून एकूण 242 प्रवासी प्रवास करत होते, त्यामध्ये 169 भारतीय प्रवासी, 53 ब्रिटीश नागरिक, पोर्तुगालचे 7 आणि कॅनडाचा एक नागरिक प्रवास करत होता.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow