मोची समाज सोबत आला म्हणजे नक्की विजय!

केंद्रीयमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे उपस्थितीत कांग्रेसी भाजपात

Nov 17, 2024 - 13:10
 0  352
मोची समाज सोबत आला म्हणजे  नक्की  विजय!

सोलापूर : सोलापूरच्या विकासात मोची समाजाचे योगदान मोठे आहे. मोची समाज भाजपासोबत आला म्हणजे विजय नक्की, असा विश्वास केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला केला. शहर मध्य मतदारसंघात भाजपा उमेदवार देवेंद्र कोठे यांच्या प्रचारार्थ विजयी मेळाव्याचे आयोजन केले होते. 

 श्री जांबमुनी मोची समाजाचा मेळाव्याप्संगी विधानसभा निवडणूक महाराष्ट्र सहप्रभारी रघुनाथ कुलकर्णी, किशोर देशपांडे, अध्यक्ष नरेंद्र काळे, मोची समाज अध्यक्ष देवेंद्र भंडारे, माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, रोहिणी तडवळकर, माजी नगरसेवक जेम्स जंगम, करेप्पा जंगम, युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष अंबादास करगुळे, नागनाथ कासलोलकर, बाबुराव संगेपांग, सरस्वती कासलोलकर, वैष्णवी करगुळे, मीनाक्षी कंपली, माजी सभापती सिद्राम अट्टेलुर उपस्थित होते.

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले, मोची समाजाच्या महामंडळाची मागणी तसेच शाळेच्या जागेची मागणी आगामी काळात सोडवण्यात येईल. मोची समाजाने वर्षानुवर्षे काँग्रेसचे एकनिष्ठेने काम केले. परंतु काँग्रेसकडून मोची समाजाला न्याय मिळाला नाही. भारतीय जनता पार्टीत मोची समाजाचा मानसन्मान राखला जाईल. तसेच लोकप्रतिनिधित्वही देण्यात येईल. 

उमेदवार देवेंद्र कोठे म्हणाले, ज्या मोची समाजामुळे काँग्रेस निवडणूक जिंकत होती त्या मोची समाजाचा काँग्रेसने केवळ वापर केला. परंतु आगामी काळात महायुती सरकारकडून मोची समाजासाठी शहरात श्री जांबमुनी महाराजांच्या नावाने भव्य भवन बांधण्यात येईल. तसेच महामंडळासह समाजाच्या इतर प्रश्नांचीही सोडवणूक करण्यात येईल. यावेळी शहराध्यक्ष नरेंद्र काळे, देवेंद्र भंडारे आदींनी मनोगते व्यक्त केली.

*आणखी ३ नगरसेवक भाजपात*

माजी नगरसेवक अनिल पल्ली, सुरेश तमशेट्टी, संजीवनी कुलकर्णी तसेच युवक काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष प्रशांत पल्ली आदींनी केंद्रीयमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला.

…....

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow