आ.विजयकुमार देशमुख यांना विठुरायाचे महावस्त्र-प्रसाद

औसेकर महाराज यांनी दिले आशीर्वाद

Nov 17, 2024 - 18:53
 0  188
आ.विजयकुमार देशमुख यांना विठुरायाचे महावस्त्र-प्रसाद

(विजयकुमार पिसे) 

सोलापूर : सोलापूर शहर उत्तर मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार आ. विजयकुमार देशमुख यांना पंढरीच्या विठुरायाचे महावस्त्र आणि प्रसाद देवून ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी मार्गदर्शन केले आणि विजयी आशीर्वाद दिला.

आ. विजय देशमुख यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती, पंढरपूरचे अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांची भेट घेतली. या भेटीत आ. विजय देशमुख यांनी निवडणुकीतील विजयासाठी मार्गदर्शन व आशीर्वाद घेतले. यावेळी औसेकर महाराज यांनी विठुरायाचे महावस्त्र व प्रसाद दिला. या संवादातून भक्ती, सेवा आणि समाजासाठी काम करण्याच्या मूल्यांची प्रेरणा मिळाली. ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्यासारख्या संतांचे आशीर्वाद आणि सहकार्य हे विजय देशमुख यांना समाजाच्या भल्यासाठी अधिक जोमाने कार्य करण्यासाठी प्रेरणा देत आहेत, अशा भावना व्यक्त केल्या.

आणि तिथे धर्मसंकट...

हभप औसेकर यांच्याकडून अशाच प्रक़ारचा आशीर्वाद घेण्यासाठी दक्षिण सोलापूरचे अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी भेटीसाठी गेले होते. तेव्हा तिथे शहर उत्तरचे शा.प.पक्षाचे उमेदवार महेश कोठे यांचे अनपेक्षितपणे आगमन झाले. त्यामुळे धर्मसंकट उभे राहिलेे. आणि त्यामुळे उभयतांना केवळ पेढा प्रसाद मिळाला.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow