ही मंडळी एकदम सेफ, पण काम
*ही मंडळी एकदम सेफ, पण काम*

(विजयकुमार पिसे)
छताडावर तुतारीचा बिल्ला लावून एक़ जबाबदार नेता स्वा.सावरकर पुतळ्याजवळ भेटला. या महाशयांना पाहताच आश्चर्य वाटले. शहराच्या (मध्य)वर्ती भागातील एका संवेदनशील प्रभागातील बूथवर खात्रीचा माणूस म्हणून त्यांची भाजपा यंत्रणेकडे नोंद. त्यामुळे आश्चर्य वाटले. या महाशयांचे रोखठोक उत्तर होते, आमचं ठरलंय, तिकडं मी तुतारी करतोय. अर्थात जबाबदार मंडळीची ही व्याख्या. असे चित्र अगदी खुल्लमखुल्ला असेल तर? आणि निकाल अपेक्षित काय असू शकेल? "लक्ष्यवेध"ची ही एक लिटमस टेस्ट. कदाचित ही यादी आणखी मोठी होईल. (पक्षानेच शोध घेतला तर) सोलापुरात ज्यांची दखल घेतली गेली नाही, अशी मंडळी मुंबईत जाऊन थेट नियुक्तीची पदं व पत्रं आणलीत. आणि आम्ही प्रदेशाचे म्हणून पुन्हा इथे अभिमानाने कॉलर ताठ. या निवडणुकीत शहर उत्तरमध्ये शा.प.पार्टीचे महेश कोठे यांच्या प्रचारात सक्रिय असलेले सुरेशअण्णा पाटलांवर हकालपट्टीची घोषणा भाजपा शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी केली. (ही माहिती अजून अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांना माहीत नाही म्हणे. (रे.फ.: पक्षाचा व्हॉटसअप ग्रुप) अण्णांची नियुक्ती थेट प्रदेशप्रमुखांनी केली होती. पण शिस्तभंगाची कारवाई स्थानिक स्तरावर? असो. अन्य पदाधिक़ारी व अनेक कार्यकर्ते जे शहरातील तीन मतदारसंघात वेगवेगळ्या भूमिका पार पाडत आहेत. कोण तुतारी वाजतोय, इकडे कमळ सांगतोय(?) आणि तिकडे कॉम्प्युटरही चालवतोय. एकदम सेफ. पण त्यांचं काम पक्ष साफ. असे साप पक्षात अजून सेफ कसे? याचं उत्तर देतील बावनकुळेजी?
.................
*माधवी लताजींना सांगावा, आमच्याकडे सभा नको*
तेलंगणाच्या माधवी लता लोकसभेची लोकसभेची केवळ एक निवडणूक़ लढवल्या. आणि एकदम टॉपच्या स्टार प्रचारक भाजपा नेत्या म्हणून त्यांची गणना झाली. (भविष्यात स्मृती इराणींची जागा घेतली तर आश्चर्य वाटू नये.) विधानसभा निवडणूक़ प्रचारासाठी त्यांना मोठी मागणी होती. सोलापुरात गेल्या रविवारी दोन सभा झाल्या. मध्य- मध्ये कोठेंसाठी आणि तिकडच्या कोठेंनाच "उत्तर" दिले. मेरी रॅली जरूर होगी. माधवी लताजी सोलापुरात बालाजी सरोवरमध्ये आल्यानंतर त्यांच्याशी "लक्ष्यवेध" संवाद झाला. त्या म्हणाल्या, मला सांगावा आलाय शहर उत्तर मतदारसंघात सभा नको म्हणून. हा निरोप शा.प.पार्टीच्या उमेदवारांकडून होता म्हणे. त्यांच्या सभेमुळे तेलुगू भाषिक मतदारांवर प्रभाव पडेल. आणि तुतारीची पिपाणी वाजंल. माधवी लताजींना तुतारी कुणाची, त्यांच्या पक्षाचे सर्वेसर्वा, आणि महाराष्ट्रात त्या नेत्यांची प्रतिमा (रे.फ. : वसंतदादा पाटील). ही सारी माहिती आणि अभ्यास होता. त्यामुळे त्या म्हणाल्या, कमळ एकदम पवित्र आहे. शहर उत्तर मतदारसंघमे जरूर रॅली होगी. वहाँ हमारे भाई विजयकुमार देशमुख खडे है. और कल रोड शो भी होगा, यहाँ सुभाषबापू (दक्षिण सोलापूर) और देवेंद्र भाई (शहर मध्य) खडे है। आणि त्यांचा रोड शो होणार नाही, असा निरोप धाडला, तरीही दुसर्या दिवशी सोमवारी माधवी लताजींनी तिनही मतदारसंघात दणकून रोड शो करून त्यांच्या चाहत्यांची मने जिंकली.
.…......
*काका तुतारी वाजंल...*
माधवी लताजींच्या माधव नगर येथे सभेसाठीच्या तयारीत व्यस्त असताना एक़ तरुण कार्यकर्ता मला भेटला. तो इकडं दादांसाठी आणि तिकडं अण्णांसाठी असा त्याचा रोल होता. आणि म्हणाला, काका मला ओळखलंत का? मी यांचा मुलगा. पप्पा शहर उत्तरमध्ये तुतारी वाजवतात. आणि मी इथं कमळ फुलवतोय. माझं कमळावर प्रेम आहे. कमळ निवडून येईल. पण काका तुतारी वाजंल का? त्याचं उत्तर काय? हे खरंय. अनेकांना कमळ प्रिय आहे. ते देवाच्या चरणावर वाहिलं जातं, पण तुतारी. गेल्या सहा महिन्यात तुतारीनं (स्ट्राईक रेट सरस असूनही) महाराष्ट्रात राजकारणाचा चिखल केलाय, असे "मनसे राज" सांगतात. ठाकरेंच्या निरीक्षणाची काही जण खिल्ली उडवतात. पण अनेकांना वाटतं तुतारीची पिपाणीच झाली पाहिजे. कारण तिकडे मराठवाड्यामध्ये समाजा- समाजामध्ये दुही पसरविली गेलीय. ते सांगतात, त्यापेक्षा अघटित घडतंय. हे तरुण कार्यकर्त्याना नकोय. म्हणून...
….…......
What's Your Reaction?






