मनपा काँग्रेस गटनेतेपदी चेतन नरोटे, भाजपा गटनेेत्याची आज पुण्यात घोषणा, तर महापौर कोण?

मनपा काँग्रेस गटनेतेपदी चेतन नरोटे, भाजपा गटनेेत्याची आज पुण्यात घोषणा, तर महापौर कोण?

Jan 31, 2026 - 01:40
 0  174
मनपा काँग्रेस गटनेतेपदी चेतन नरोटे, भाजपा गटनेेत्याची आज पुण्यात घोषणा, तर महापौर कोण?

 सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसचे दोन सदस्य निवडून आले असून मनपा गटनेतेपदी पक्षाचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांची निवड करण्यात आली. दरम्यान शिवसेना शिंदे गटाच्या गटनेतेपदी जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे तर एमआयएम गटनेते पदी ज्येष्ठ नगरसेविका वहिदाबानो भंडालेे यांची यापूर्वीच निवड करण्यात आली आहे. शिंदे सेनेचे चार तर एमआयएमचे आठ सदस्य निवडून आले आहेत. तसेच भाजपा गटनेत्याची आज पुण्यात औपचारिक घोषणा होण्याची शक्यता आहे. यासाठी तीन नावांची चर्चा सुरू आहे.

दरम्यान भाजपाचे सर्वाधिक़ 87 सदस्य यंदा मनपात निवडून आले आहेत, हाच पक्ष सत्ताधारी म्हणून काम करणार आहे. निवडणूक निकाल लागून 15 दिवस झाले तरी अद्याप गटनेता निवडीचे गुर्‍हाळ सुरू आहे. खुल्या गटातील महापौर कोणाला यावरून नगरसेवकांऐवजी नेत्यांमध्येच रस्सीखेच सुरू आहे, महापौर पद खुले झाले आहे, त्यामुळे खुल्या प्रवर्गातून निर्वाचित नगरसेवकालाच संधी द्यावी, अशी मागणी पुढे आली आहे. त्यासाठी आग्रह धरला जात आहे. त्यामुळे गटनेतेपद खुल्या प्रवर्गाऐवजी अन्य प्रवर्गातून निर्वाचितास संधी द्यावी,असाही एक मतप्रवाह आहे. नरेंद्र काळे,प्रा.नारायण बनसोडे, बिज्जू प्रधाने यांच्यासह किंवा महिला सदस्या यांना गटनेतेपद सोपवावे, अशी चर्चा देखील आहे. आज शनिवारी भाजपाचे 87 जणांचे शिष्टमंडळ पुणे विभागीय आयुक्तांकडे नाेंंदणीसाठी उपस्थित राहणार आहे. गटनेता नक्की झाला आहेच, त्याची घोषणा पुण्यात गटनोंदणीप्रसंगी होईल. पुरुष गटनेता झाला तर महापौर महिला होण्याची दाट शक्यता आहे.

    एकेकाळी सत्तेत असलेल्या काँग्रेस पक्षाचे यंदा केवळ दोन सदस्यच विजयी झाले. संयुक्त बैठकीत महापालिकेत काँग्रेस पक्षाचा स्वतंत्र गट स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या सूचनेनुसार प्रभाग क्रमांक 15-ड मधून निवडून आलेले नगरसेवक चेतन पंडित नरोटे यांची काँग्रेस गटनेतेपदी निवड करण्यात आली. त्यानुसार काँग्रेस गटाची अधिकृत नोंदणी पुणे येथे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडे करण्यात आली. यावेळी नगरसेवक चेतन नरोटे व नरसिंह आसादे उपस्थित होते. महापालिकेत काँग्रेसचा अधिकृत गट स्थापन झाल्याने शहरातील नागरिकांच्या प्रश्‍नांवर काँग्रेस पक्ष अधिक ठाम व प्रभावी भूमिका मांडणार असल्याचे यावेळी नरोटे यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी काँग्रेसचे मीडिया प्रमुख तिरुपती परकीपंडला, शिवशंकर अंजनाळकर यांच्यासह शिवसेना शिंदे सेना पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow