महापौर पद ओपन; 87 कारभारीपैकी कुणाला संधी?
प्रथम नागरिकाचा मान कुणालाही मिळेल, खुले आरक्षण आणि भाजपाचे धक्कातंत्र
(विजयकुमार पिसे)
सोलापूर महापौर पदाचे आरक्षण खुले (ओपन) प्रवर्ग आहे. महापालिका निवडणुकीपूर्वीच काही नावांची चर्चा आहे. आणि निवडणूक निकालानंतर आणखी काही नावांची यात भर पडली. तसेच 22 जानेवारी रोजी आरक्षण जाहीर झाले, त्यानंतर खुल्या प्रवर्गातील निवडून आलेल्या आणखी काही नगरसेवकांची चर्चा सुरू झाली. खुले प्रवर्ग असल्यामुळे निर्वाचित सर्व 102 किंवा सत्ताधारी 87 कारभारी यापैकी कुणीही दावा शकतो. प्रथम नागरिकाचा मान कुणालाही मिळेल. त्यामुळे अमुक एका नावाचीच चर्चा कितपत व्यवहार्य होईल?
भाजपा नेहमीच धक्कातंत्र वापरतो, असा अनुभव आहे. त्यामुळे महापौरपदाची लॉटरी कुणाला लागेल हे अनिश्चित आहेच. पक्षाचे स्थानिक नेते, आमदार, पदाधिक़ारी आणि निरीक्षक कुणाची शिफारस करतील, त्यावरही निवड अवलंबून आहे.
महापालिकेसाठी 2 एसटी प्रवर्ग, 15 एससी, 27 ओबीसी आणि अन्य खुला प्रवर्ग असे आरक्षण असून यामध्ये 50 टक्के महिला राखीव आहेत. शिवाय खुल्या प्रवर्गात ओबीसी निवडून आले आहेत, तर ओबीसी प्रवर्गात खुल्या गटातील काहीजणांकडे ओबीसी दाखले असल्यामुळे असे काही उमेदवार निवडून आले आहेत. या सगळ्यांची गोळाबेरीज शेवटी 102 होते. त्यामुळे यापैक़ी कुणीही महापौरपदावर दावेदारी करू शकतो. उमेदवारी कुणाला, याचा निर्णय पक्ष घेणार आहे. त्यामुळे अनेक इच्छुक श्रेष्ठींकडे मागणी करणार आहेत.
प्रथमदर्शनी विनायक कोंड्याल, डॉ.किरण देशमुख,शिवानंद पाटील,नरेंद्र काळे,प्रथमेश कोठे, अनंत जाधव, सत्यनारायण गुर्रम,गणेश वानकर,संजय कोळी,राजकुमार पाटील,रवी कैयावाले,सात्विक बडवे तसेच राजश्री कणके,रंजीत चाकोते,मंजिरी किल्लेदार,अश्विनी चव्हाण,संगीत जाधव,राजश्री दोडमनी या कारभारीन्ची नावे चर्चेत आहेत. यापेक्षा आणखी काही नावे असू शकतात. आपल्याच समर्थक़ नगरसेवकासाठी नेत्याचा शब्द पक्षश्रेष्ठींकडे कितपत वजनदार ठरतो, शेवटी भाजपाचे धक्कातंत्र पाहता *अन्य पक्षांतील नवीन इनकमिंग चेहरा याचाही विचार करू शकतील? पण पुढील काही दिवस रोज नवनवीन नावे महापौरपदासाठी चर्चेत राहतील. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात महापौरपदाची माळ गळ्यात घालण्यासाठी इंद्रभुवन उत्सुक राहणार आहे. पण हे पद खुले आहे, त्यामुळेच सर्व 102 किंवा सत्ताधारी 87 निर्वाचित कारभारी यांना संधी आहे.
What's Your Reaction?





