सर्वोपचार रुग्णालयात नवीन एमआरआय मशीन
आ.कोठेंच्या प्रयत्नाला फडवीसांकडून होकार, टेंडरही झाले प्रसिद्ध
सोलापूर : श्री छत्रपती शिवाजी महाराज शासकीय सर्वोपचार (सिव्हील हॉस्पीलटल) रुग्णालयासाठी नवीन एमआरआय मशीन उपलब्ध होणार असून आ.कोठे यांच्या पाठपुराव्यास मुख्यमंत्री फडणवीस यांनी होकार दर्शवत मागणीपत्रावर शेरा मारला आहे.
एमआरआय मशीनसाठी अजीतदादांशीही चर्चा झाली होती. तसेच पालकमंत्री जयकुमार गोरे देखील आग्रही होते, अशी माहिती आ.देवेंद्र कोठे यांनी दिली.
नव्या तंत्रज्ञानासह एमआरआय (टेस्ला -3)मशीन उपलब्ध झाल्यास शहर जिल्ह्यासह मराठवाडा तसेच आंध्र, कर्नाटक, तेलंगणा येथील रुग्णांना दिलासा मिळणार आहे. आ.कोठे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. तसेच पालकमंत्री गोरे देखील आग्रही होते. मंगळवारी मुख्यमंत्र्यांनी आ.कोठेंच्या मागणीपत्रावर शेरा मारून नवीन एम.आर.आय. मशीन उपलब्ध करून देण्याबाबत आरोग्य विभागाला सूचना दिल्या आहेत. त्यामुळे नवीन मशीन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
दरम्यान याबाबत दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशीही आ.कोठे यांनी चर्चा केली होती. सोलापूरच्या रुग्णसेवेत भर घालणेसाठी पालकमंत्री जयकुमार गोरे आग्रही आहेत. याबद्दल आ.कोठे यांनी मुख्यमंत्री फडणवीस,पालकमंत्री गोरे यांचे आभार मानले आहेत.
What's Your Reaction?