भाजपा गटनेतेपदी काळेे; आता लक्ष्य महापौर! खुला की आरक्षित; दोन गटात चुरस
भाजपा गटनेतेपदी काळेे; आता लक्ष्य महापौर! खुला की आरक्षित; दोन गटात चुरस
(विजयकुमार पिसे)
मनपात सत्ताधारी भाजपा गटनेतेपदी बावनकुळे समर्थक नरेंद्र काळे यांची अपेक्षेप्रमाणे वर्णी लागली असून आता लक्ष्य महापौर पदाकडे लागले असून हे पद खुले की आरक्षित प्रवर्गाकडे जाणार ही उत्सुकता असतानाच दोन गटामध्येच चुरस दिसून येत आहे. निर्वाचितांमध्ये इनकमिंग नगरसेवकांची संख्या मोठी असून इनकमिंग पैकीच एकजण शहराचा/ची पहिला/पहिली नागरिक ठरेल असा तर्क आहे.
भाजपा गटाची नोंदणी करणेसाठी 87 निर्वाचित सदस्यांचे शिष्टमंडळ शनिवारी पुण्यास गेले होते. या नोंदणीप्रसंगी गटनेत्याची औपचारिक घोषणाच अपेक्षित होती आणि चर्चेत ज्यांचे नाव आघाडीवर होते, ते नरेंद्र काळे यांच्या नावावर भंडारा उधळणार हीच शक्यता अधोरेखित झाली. आता लक्ष्य महापौर निवडीकडे लागले आहे. खुल्या प्रवर्गासाठी आरक्षण निघाले आहे. त्यामुळे गटनेता कोण होणार याची उत्सुकता होती. कारण महापौरपदाचे उत्तर गटनेतेपदात दडले आहे. (तसे वृत्त लक्ष्यवेधने 25 रोजी प्रसिध्द केले आहे.) नरेंद्र काळे यांचे नाव महापौरपदाच्या चर्चेत होते, फक्त ते आणले गेले. त्यासाठी अन्य नावांचीही फक्त जोड दिली गेली होती. गटनेता पुरुष झाला तर महिला महापौर होईल,असा एक अंदाज वर्तविला जात आहे. पण त्यामध्ये कितपत तथ्य आहे? पक्षात पूर्वी दोन गट होते, त्यांनी/त्यांना या सर्व घडामोडींपासून अंतर ठेवलेमुळे उर्वरित दोन गटात महापौर पदासाठी चुरस असल्याची चर्चा पुणे येेथे गटनोंदणीसाठी गेलेल्या नगरसेवकांमध्ये होती.
नरेंद्र काळे यांची गटनेते म्हणून वर्णी लागली,त्यामुळे साहजिकच ते सभागृहनेते होतील. कदाचित यापेक्षा मोठी जबाबदारी दिली तर? आश्चर्य वाटू नये. काळे बावनकुळे समर्थक मानले जातात. त्यांचे पक्षाध्यक्षपद गेल्यानंतर ऑगस्टमध्ये झालेल्या एका कार्यक्रमास मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आवर्जून उपस्थित होते. त्यांचे पालकत्व स्वत:कडे घेतले असे मानले गेले. रवींद्र चव्हाण विद्यमान प्रदेशाध्यक्ष असले तरी बावनकुळे अजूनही त्याच फ्रेममध्ये आहेत, कारण मनपा निवडणूक निकाल लागल्यानंतर बावनकुळे यांनी सर्व निर्वाचित नगरसेवकांना व्यक्तिश: अभिनंदनाचे पत्र पाठवले होते, अनेक निर्वाचितांनी सो.मि.वर ते पत्र आवर्जून व्हायरल केले होते. त्यामुळे गटनेता आणि महापौर निवडीत बावनकुळे पडद्यामागची भूमिका पार पाडतील असे मानले जाते. तसे झालेच तर?
What's Your Reaction?





